तरुणीचा विनयभंग करून बेदम मारहाण़़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:46 PM2018-06-22T23:46:13+5:302018-06-22T23:46:33+5:30
मैत्रिणीसमवेत पायी जाणाऱ्या तरुणीस सहा संशयितांनी अडवून तिचा बुरखा ओढून विनयभंग करीत बेदम मारहाण केल्याची घटना वडाळागावातील अमन मेडिकलजवळ घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पाच जणांना अटक केली आहे़
नाशिक : मैत्रिणीसमवेत पायी जाणाऱ्या तरुणीस सहा संशयितांनी अडवून तिचा बुरखा ओढून विनयभंग करीत बेदम मारहाण केल्याची घटना वडाळागावातील अमन मेडिकलजवळ घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पाच जणांना अटक केली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी आपल्या मैत्रिणीसमवेत मंगळवारी (दि़ १९) सकाळी वडाळागावातील अमन मेडिकलजवळून पायी जात होती़ यावेळी संशयित शौक मुजफ्फर शहा (१९) याने तरुणीला अडवून अश्लील शिवीगाळ केली़ यानंतर या तरुणीचा बुरखा फाडून विनयभंग करीत बेदम मारहाण केली़ यामध्ये तरुणी जखमी झाल्याने तिचे कुटुंबीय जाब विचारण्यासाठी गेले असता संशयित तौफिक खालिद शेख (२३), वसिम बशीर सय्यद (३२), रिजवान फिरोज खान (२८), इम्तियाज उमर शेख (३२) व शौकत काका जहूर शहा (सर्व रा. वडाळागाव, नाशिक) यांनी लाथाबुक्क्यांनी तसेच रॉडने मारहाण करून जखमी केले. या घटनेत पीडित तरुणीचा नातेवाईक रमिज शेख हा जखमी झाला आहे़ या प्रकरणी पीडित तरुणीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़
निलगिरी बागेत एकाची आत्महत्या
नाशिक : राहत्या घरात वायरने गळफास घेत एकाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़ २१) दुपारच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील निलगिरी बाग परिसरात घडली़ नामदेव सुखदेव अहिरे (४७, रा. घर नंबर ५४, बिल्डिंग नंबर ४, निलगिरी बाग, औरंगाबाद रोड) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नामदेव अहिरे यांनी गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरातील पंख्यास वायरच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
घरमालकावर गुन्हा दाखल
नाशिक : भाडेतत्त्वावर दिलेल्या घरात राहणाºया भाडेकरूची माहिती स्थानिक पोलिसांना न देणाºया घरमालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ देवरतन पंडित (रा. सातपूर) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयित घरमालकाचे नाव आहे. पंडित यांनी आपले घरात भाडेकरू ठेवले मात्र स्थानिक पोलीस ठाण्यास याची माहिती दिलीच नाही़ या प्रकरणी पोलीस शिपाई विवेक भदाणे यांनी फिर्याद दिली आहे़
दुचाकी अपघातात पाथर्डीतील युवकाचा मृत्यू
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील पांडवलेण्याजवळील नेहरू वनोद्यानासमोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात पाथर्डी फाट्यावरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ दत्तात्रय दुर्गादास ओगले (३२, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघाताची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि़ १८) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दत्तात्रय ओगले हे दुचाकीने पाथर्डी फाट्यावरून विल्होळीकडे जात होते़ महामार्गावरील नेहरू उद्यानाजवळ त्यांची दुचाकी घसरून झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली़