‘त्या’ तरुणीचे आॅनर किलींग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:57 PM2018-10-04T16:57:36+5:302018-10-04T16:58:33+5:30
मालेगाव : गेल्या दोन दिवसांपूवीॅ शहरात प्रेम प्रकरणाच्या संशयावरून आई-वडीलांच्या नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना घडली आहे.. तरुणी नेहा चौधरीचे मृतदेह पोलिसांनी सरणावरून उचलनू नेऊन तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता हा आॅनर किालिंगचा प्रकार उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
मालेगाव : गेल्या दोन दिवसांपूवीॅ शहरात प्रेम प्रकरणाच्या संशयावरून आई-वडीलांच्या नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना घडली आहे.. तरुणी नेहा चौधरीचे मृतदेह पोलिसांनी सरणावरून उचलनू नेऊन तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता हा आॅनर किालिंगचा प्रकार उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन नेहा शरद चौधरी (१८) रा. इंद्रायणी कॉलीनी कलेक्टरपट्टा या तरुणीचा सख्या आई सुनिता शरद चौधरी, वडील शरद सखाराम चौधरी व चुलत भाऊ नीलेश मधुकर चौधरी यांनी नेहाला झोपेच्या गोळ्या देऊन गळा आवळून निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी छावणी पोलीसांनी तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी तिघा संशयीतांची वैद्यकीय तपासणी केली आहे. या तिघांना उद्या शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान महाविद्यालयीन पाच संशयीत विद्यार्थ्यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कलेक्टरपट्टा भागात राहणाऱ्या नेहा चौधरी हिचा मंगळवारी रात्री संशयास्पद मृत्यु झाल्याचा निनावी फोन येथील पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. या फोनची पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे व छावणी पोलीसांनी गंभीर दखल घेतली होती. नेहाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात आला होता. पोलीसांनी नेहाचा सरणावरुन मृतदेह उचलून नेऊन सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन केले होते. शवविच्छेदन अहवालानुसार नेहाचा मृत्यु हा झोपेच्या गोळ्या देऊन झोपेत असताना गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाले होते. पोलीसांनी तपासाची चक्रे गतीमान केली होती. नेहाचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन व सामाजिक प्रतिष्ठा जोपासण्यासाठी मंगळवारी नेहाला आई सुनिता शरद चौधरी हिने जेवणातुन झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या होत्या. ती झोपल्यानंतर वडील शरद राजाराम चौधरी याने पुतण्या नीलेश मधुकर चौधरी याला घरी बोलवून घेतले. त्यानंतर तिचे हातपाय दाबून ठेवत नीलेशने तिचा गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस झाले आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक राहूल पाटील यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे करीत आहेत.