पंचवटीत दहावी परीक्षेत मुलींची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:15 AM2019-06-11T01:15:51+5:302019-06-11T01:17:20+5:30
दहावी परीक्षेत पंचवटी परिसरातील विविध ठिकाणच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. दहावीच्या परीक्षेत यंदाच्या वर्षीदेखील काही शाळांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.
पंचवटी : दहावी परीक्षेत पंचवटी परिसरातील विविध ठिकाणच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. दहावीच्या परीक्षेत यंदाच्या वर्षीदेखील काही शाळांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.
नवीन आडगाव नाका येथील तपोवन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री स्वामीनारायण इंग्लिश मीडियम स्कूल ९९.२९ टक्के इतका निकाल लागला. विद्यालयात तिन्ही मुलींनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तसेच तृतीय क्रमांक पटकाविला आहे. अनुष्का तुकाराम केंद्रे या विद्यार्थिनीने ९१.६० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर गायत्री वसंत घुले ही विद्यार्थिनी द्वितीय क्र मांकाची मानकरी ठरली. तिला शेकडा ९०.२० टक्के गुण मिळाले आहे. तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पूर्वा पंकज पाटील हिला ८९.६० टक्के गुण मिळाले. उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे स्वामी ज्ञानपुराणी, माधव प्रकाश स्वामी, मुख्याध्यापक अस्मिता पटेल उपस्थित होते.
पुणे विद्यार्थिगृह संचलित काकासाहेब देशमुख विद्यालयाचा परीक्षेचा ८० टक्के निकाल लागला आहे. महाविद्यालयात यंदा तिन्ही विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्र मांक पटकावला आहे. वैभव भास्कर वानखेडे या विद्यार्थ्याला शेकडा ९०.२० टक्के गुण मिळाले तो विद्यालयात प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण झाला, तर अविनाश किसन थविल याने ७४.८० टक्के गुण मिळवून द्वितीय क्र मांक मिळविला. विक्र ांत रवींद्र केकाने या विद्यार्थ्याने ७२.८० टक्के गुण मिळवत विद्यालयात तृतीय
क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. संस्थेच्या वतीने या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक अमोल जोशी, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर निंबकर उपस्थित होते.
दिंडोरीरोडवरील डॉ. काकासाहेब देवधर इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावीचा ९८ टक्के निकाल लागला आहे. विद्यालयात तीनही विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय
क्र मांक पटकावण्याचा मान मिळविला आहे. आकांक्षा भोंगे या विद्यार्थिनीने शेकडा ९५ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्र मांक मिळविला, तर समृद्धी शिंदे ही द्वितीय क्र मांकाने उत्तीर्ण झाली. तिला शेकडा ९३ टक्के गुण मिळाले तृतीय क्र मांकाने उत्तीर्ण झालेल्या तेजल भालेराव हिने ९२.८० टक्के गुण मिळविले परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपकार्याध्यक्ष संजय गुंजाळ मुख्याध्यापक भारती पाटील उपस्थित होते.
श्रीराम विद्यालय ९१.६६ टक्के
तरुण ऐक्य मंडळ संचलित श्रीराम विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा ९१.६६ टक्के इतका निकाल यावर्षी लागला. माध्यमिक शालांत परीक्षेसाठी एकूण ३२४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सुमारे ३०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
युनिव्हर्सल अकॅडमी इंग्लिश स्कूलचा निकाल ८९.६० टक्के लागला. परीक्षेत साक्षी रोकडे हिने ८५.६० टक्के गुण मिळवत प्रथम, तर प्रतीक्षा काळे हिने ८३.६० टक्के गुण द्वितीय, मृदुला पटाईत हिने ८२.८० टक्के मिळवून तृतीय क्र मांक मिळविला.