कुुस्त्यांची दंगलीत मुलींचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 06:47 PM2019-03-07T18:47:11+5:302019-03-07T18:50:50+5:30
उमराणेसह पंचक्र ोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील रामेश्वर महाराजांची यात्रे आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या दंगलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुस्तीशौकीनांसाठी भव्य कुस्त्यांची दंगल होऊन कुस्ती दंगलीसाठी जिल्ह्यातील नामांकीत मल्लांनी हजेरी लावली. जिंकलेल्या मल्लविरांना रोख स्वरु पात बिक्षसे देऊन गौरविण्यात आले. यावर्षी महिला सरपंच लताबाई देवरे यांच्या संकल्पनेतुन प्रथमच महिला कुस्त्यांची दंगलही यात्रा समतिीच्या भरविण्यात आली होती.महिला कुस्ती दंगल बघण्यासाठी महिलांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
उमराणे : उमराणेसह पंचक्र ोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील रामेश्वर महाराजांची यात्रे आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या दंगलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुस्तीशौकीनांसाठी भव्य कुस्त्यांची दंगल होऊन कुस्ती दंगलीसाठी जिल्ह्यातील नामांकीत मल्लांनी हजेरी लावली. जिंकलेल्या मल्लविरांना रोख स्वरु पात बिक्षसे देऊन गौरविण्यात आले. यावर्षी महिला सरपंच लताबाई देवरे यांच्या संकल्पनेतुन प्रथमच महिला कुस्त्यांची दंगलही यात्रा समतिीच्या भरविण्यात आली होती.महिला कुस्ती दंगल बघण्यासाठी महिलांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महिला दिनाच्या पूर्वंसंध्येला सरपंच लताबाई देवरे व यात्रा समितीच्या वतीने कुस्ती खेळणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.
चार दिवस भरणाऱ्या या यात्रोत्सव काळात पारंपारिक व मनोरंजनात्मक कार्यक्र मांचे आयोजन यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले होते. कोरीव कलाकौशल्ययुक्त सजविलेल्या रथातुन रामेश्वर महाराजांच्या मुर्तीची मिरवणुक काढण्यात आली .या मिरवणुकीदरम्यान गावात रांगोळी काढुन अंगण सजवून देवाची व रथाची मनोभावे पुजा केली . निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा किर्तनाचा कार्यक्र म झाला. सुरेश भगत यांच्या हस्ते बारागाड्या ओढण्यात आल्या. रात्री वगसम्राट सविताराणी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा सादर करण्यात आला. रात्री नवयुवक युवती व कलारिसकांसाठी मराठी जल्लोष व कॉमेडी आर्केस्ट्रा कार्यक्र म सादर होऊन यात्रोत्सवाची सांगता झाली. यात्रोत्सव शांततेत पार पडल्यानेआभार व्यक्त करण्यात आले.
उमराणे येथील यात्रेला विषेश महत्त्व
रामायण काळातील शिविलंग प्रभुरामचंद्रांनी केले होते पुजन इ.स.पुर्वीच्या काळात प्रभु रामचंद्र वनवासात असताना ते जेथे मुक्काम करत तेथे पुजाअर्चना करण्यासाठी शिविलंग बनवत व जातेवेळी ते विसर्जीत करत. त्याचप्रमाणे त्यांनी उमराणे येथील परसुल निदतीरावर मुक्काम करु न वालुकामय शिविलंग बनविले होते.परंतु जातेसमयी ते शिविलंग विसिर्जत न करताच मार्गस्त झाल्याने त्या काळापासून ते शिविलंग आहे तेथेच आहे. त्यामुळे गावाला रामेश्वर ग्रामदैवत मिळाले अशी अख्यायिका आहे.त्यानंतर दिवसेंदिवस या श्रीक्षेत्र रामेश्वर महाराजांची महती सर्वदुर वाढत जाऊन जागृत देवस्थान म्हणून येथील हे देवस्थान उदयास आले आहे.