नाशकात दहावीच्या निकालातही मुलींचीच बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:26 PM2018-06-08T12:26:50+5:302018-06-08T12:26:50+5:30
नाशकात दहावीच्या निकालातही मुलींचीच बाजी नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 8) जाहीर झाला असून बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालातही मुलींचेच वर्चस्व दिसून आले आहे. नाशिक विभागातून 90. 28 टक्के मुली तर 85 .15 टक्के मुले उत्तीर्ण झाल्याची माहिती नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 8) जाहीर झाला असून बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालातही मुलींचेच वर्चस्व दिसून आले आहे. नाशिक विभागातून 90. 28 टक्के मुली तर 85 .15 टक्के मुले उत्तीर्ण झाल्याची माहिती नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.विभागातील सुमारे दोन लाख 54 हजार विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 87 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विभागाचा निकाल 87.42 टक्के लागाला आहे. तर नाशिक जिल्ह्याचा निकाल 88.47 टक्के लागला आहे. जिल्ह्यातील 90 हजार 283 विद्यार्थापैकी 89 हजार 872 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात 85.96 टक्के मुले तर 91.43 मुलींचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातून सुमारे 23 हजार 636 विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली असून 33 हजार 47 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झासे आहेत. 20 हजार 416 विद्यार्थी द्वीतीय श्रेणीत तर 20 विद्याथ्यार्थ्यांना 773 उत्तीर्ण श्रेणी प्राप्त झाली आहे. दुपारी 1 वाजेनंतर विद्यार्थांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाइन निकाल पाहाता येणार आहे. यासाठी मंडळाने तीन अधिकृत संकेतस्थळे जाहीर केली आहेत. तसेच निकालाची प्रिंटआउटदेखील काढता येणार आहे. मोबाइलवरूनदेखील निकाल पाहण्याची सुविधा बीएसएनएलने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी विद्याथ्र्याना एमएचएसएससी स्पेस सीटनंबर टाइप करून 57766 या क्रमांकावर पाठवायचे आहे. ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासूनच विद्यार्थी अधिकृत गुणपत्रकाची वाट न पाहता गुणपडताळणी व छायांकित प्रतींसाठी अर्ज करू शकणार आहेत. यासाठी आवश्यक तो अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. अधिक माहिती हवी असल्यास विद्यार्थी नाशिक विभागीय मंडळाशीदेखील संपर्क करू शकणार आहेत. पुनरमुल्यांकनासाठी मात्र विद्यार्थ्यांनाना मात्र प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळविणे अपेक्षित आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुढील पाच दिवसांत विद्यार्थी पुनमरूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात.