जिल्ह्यातील मुली मुलांपेक्षा हुशार; गतवर्षीपेक्षा यंदा निकालात ५ टक्के वाढ

By संकेत शुक्ला | Published: May 27, 2024 04:50 PM2024-05-27T16:50:26+5:302024-05-27T16:52:05+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला.

girls in the are smarter than boys 5 percent increase in result this year compared to last year in nashik | जिल्ह्यातील मुली मुलांपेक्षा हुशार; गतवर्षीपेक्षा यंदा निकालात ५ टक्के वाढ

जिल्ह्यातील मुली मुलांपेक्षा हुशार; गतवर्षीपेक्षा यंदा निकालात ५ टक्के वाढ

संकेत शुक्ल,नाशिक : सोमवारी (दि.२७) जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला. जिल्ह्याचा निकालही यंदा मागच्या निकालाच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढलेला दिसला. जिल्ह्यात ९३ हजार ७५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात ४९ हजार ७३९ मुले तर ४४ हजार २० मुली प्रविष्ठ झाल्या होत्या. त्यापैकी ५६ हजार ६४१ मुले, तर ४२ हजार ६९६ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण झालेल्या मुलांची टक्केवारी ९३.७७, तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९६.९९ इतकी आहे.

जिल्ह्यातील सरासरी उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.२८ इतकी आहे. त्यामध्ये त्र्यंबक तालुक्यातील मुले आणि सरासरी ९८ यक्के गूण मिळवून आघाडीवर आहेत.

तालुकानिहाय निकाल-

तालुका   मुले           मुली
चांदवड : ९३.४५,  ९७.४५
दिंडोरी : ९२.८८,    ९६.९३
देवळा : ९६.४३,      ९७.५०
इगतपुरी : ९४.१४,    ९७.०७
कळवण : ९६.१२,   ९६.३८
मालेगाव : ९४.२६,   ९६.०२
नाशिक : ९१.८९,     ९७.१५
निफाड : ९४.६५,    ९६.८७
नांदगाव : ९०.६५,    ९५.५१
पेठ : ९६.२९,           ९६.८१
सुरगाणा : ९६.८३,    ९८.७५
सटाणा : ९५.१७,     ९७.६०
सिन्नर : ९४.६१,       ९७.६७
त्र्यंबकेश्वर : ९७.७४, ९८.९८
येवला : ९३.५३,      ९७.९८
मालेगाव महापालिका : ८५.६१, ९३.८२
नाशिक महापालिका :९५.२७, ९७.६९.

४३९० विद्यार्थी नापास-

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या एक वा दोन विषयांत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची सुविधा लागू राहणार आहे. या सुविधेचा लाभ राज्यातील २६ हजार ६४५ विद्यार्थ्यांना होणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ४३९० विद्यार्थी नापास झाले असून जुलै महिन्यात घेतल्या जाणाऱ्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास त्यांना महाविद्यालयीन प्रवेशाचा मार्ग मोकळा राहणार आहे.

Web Title: girls in the are smarter than boys 5 percent increase in result this year compared to last year in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.