एकतर्फी प्रेमातून मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 01:00 AM2019-05-15T01:00:02+5:302019-05-15T01:00:56+5:30
एकतर्फी प्रेमामधून संशयित मंगेश दशरथ वाटोरे याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत संशयित मंगेशविरुद्ध अंबड पोलिसांनी विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Next
नाशिक : एकतर्फी प्रेमामधून संशयित मंगेश दशरथ वाटोरे याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत संशयित मंगेशविरुद्ध अंबड पोलिसांनी विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगेश हा पीडित युवतीचा पाठलाग करून बळजबरीने प्रेमासाठी होकार मागत होता. तसेच भावासह आई-वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकीही त्याने दिल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी चुंचाळे गावातील मंगेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.