व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलींचा रेणुका, तर मुलांमध्ये यशवंत संघ अजिंक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:12 PM2018-04-30T17:12:33+5:302018-04-30T17:12:33+5:30
यशवंत व्यायामशाळेतर्फे 27 ते 29 एप्रिलदरम्यान मिनी गटाच्या 14 वर्षाआतील मुला-मुलींच्या खुल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत शेवटच्या दिवशी रविवारी मुलांचे आणि मुलींचे अंतिम सामने खेळविले गेले. यातील मुलींच्या रेणुका संघाने तर मुलांच्या यशवंत संघाने स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत अजिंक्यपद पटकावले. व्यायामशाळेचे सभासद दिवंगत जेम्स अँथोनी आणि शैलेन्द्र क्षीरसागर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या हॉलीबॉल स्पर्धेत टी. जे. चव्हाण संघ व रेणुका संघादरम्यान रंगलेल्या सामन्यात चुरस बघायला मिळाली.
नाशिक : यशवंत व्यायामशाळेतर्फे 27 ते 29 एप्रिलदरम्यान मिनी गटाच्या 14 वर्षाआतील मुला-मुलींच्या खुल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत शेवटच्या दिवशी रविवारी (दि.29) मुलांचे आणि मुलींचे अंतिम सामने खेळविले गेले. यातील मुलींच्या रेणुका संघाने तर मुलांच्या यशवंत संघाने स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत अजिंक्यपद पटकावले. व्यायामशाळेचे सभासद दिवंगत जेम्स अँथोनी आणि शैलेन्द्र क्षीरसागर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या हॉलीबॉल स्पर्धेत टी. जे. चव्हाण संघ व रेणुका संघादरम्यान रंगलेल्या सामन्यात चुरस बघायला मिळाली. सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये टी. जे. चव्हाण संघाच्या हिमांशी ओतारी, समृद्धी बागुल आणि मीनाक्षी झोपे या खेळाडूंनी चांगल्या सव्र्हिस आणि परतीचे फटके मारून पहिला सेट जिंकून 1-0 अशी आघाडी मिळविली. तर दुसऱ्या सेटमध्ये नाशिकरोडच्या रेणुका संघाने जोरात वापसी करून 1-1 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्येही रेणुका संघाने आपल्या खेळात सातत्य राखून सामन्यासोबतच स्पर्धेचे अजिंक्यपदही जिंकले. रेणुका संघातर्फे सिद्धी खैरे, प्राची तांबट, सुवर्णा हगवणो, अदिती चांद्रमोरे, संजना माळी यांनी चांगला खेळ करून आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मुलांचा सामना यशवंत संघ आणि फ्रावशी अकादमी यांच्यात रंगला. या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये फ्रावशी संघाने 15-12 अशी आघाडी मिळविली. परंतु नंतर यशवंतच्या खेळाडूंनी आपापसात समन्वय साधत हा सेट 25-23 असा जिंकून आघाडी घेतली. तिसऱ्या सेटमध्येही यशवंत संघाने सुरुवातीपासून सावध खेळ करीत 25-19 जिंकून या स्पर्धेचे मुलांचे विजेतेपद मिळविले. विजेत्या यशवंत संघाच्या श्लोक गायकवाड, तन्मय घुगे, सार्थक चव्हाण अर्चित गुंजाळ, रोहित चव्हाण यांनी लक्षणीय खेळ करीत संघाला विजय मिळवून दिला. स्पर्धेतील विजेते संघ उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, अधिक दुधारे, रोसाम्मा अँथोनी, नितीन क्षीरसागर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन अविनाश खैरनार यांनी केले.
स्पर्धेचा निकाल
यशवंत व्यायामशाळेतर्फे घेण्यात आलेल्या मिनी गटाच्या 14 वर्षाआतील मुले व मुलींच्या खुल्या आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत शेवटच्या दिवशी मुलींच्या संघांमधून रेणुका अकादमीने प्रथम, टी. जे. चव्हाण स्कूलने द्वितीय व सॅक्रेड हार्ट स्कूलने तिसरा क्रमाक पटकावला. तर मुलांच्या संघामध्ये यशवंत अकादमीने प्रथम, फ्रावशी अकादमीने द्वितीय व टी. जे. चव्हाण स्कूलने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत सहभागी मुलींच्या संघांपैकी रेणुका संघाच्या सिद्धी खैरे, टी. जे. चव्हाण संघाच्या हिमांशी ओतारी व सॅक्रेड हार्ट स्कूलच्या श्रेया कोरडे व रंगूबाई जुन्नरे स्कूलच्या संघातील ऋ तुजा विघ्ने यांना उत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक मिळाले. तर मुलांच्या संघामध्ये यशवंत अकादमीच्या श्लोक गायकवाड, सार्थक चव्हाण, फ्रावशीच्या कार्तिक क्षीरसागर, टी. जे. चव्हाण स्कूलच्या आयुष्य निकम यांनी उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळवला.