मुलींनी उच्चशिक्षणाचा ध्यास बाळगावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:14+5:302021-03-14T04:14:14+5:30

नॅशनल उर्दू कॉलेज कॅम्पसमध्ये जरीन खान हिचा व्यवस्थापन मंडळाच्या वतीने छोटेखानी गौरव कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी केवळ निवडक विद्यार्थ्यांना ...

Girls should focus on higher education | मुलींनी उच्चशिक्षणाचा ध्यास बाळगावा

मुलींनी उच्चशिक्षणाचा ध्यास बाळगावा

Next

नॅशनल उर्दू कॉलेज कॅम्पसमध्ये जरीन खान हिचा व्यवस्थापन मंडळाच्या वतीने छोटेखानी गौरव कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी केवळ निवडक विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता फिजिकल डिस्टन्स बाळगत अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थिती खानचा गौरव करण्यात आला. मंचावर व्यवस्थापन मंडळाचे उपाध्यक्ष अलीमभाई शेख,

सचिव प्रा. जाहिद शेख, सोहेल शेख, हसन मुजावर, सनदीलेखापाल सलीम मनियार, मोबिन मनियार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सीए परीक्षेत नाशकात द्वितीय स्थान मिळविणारा सलिल सलीम मनियार तसेच पीएचडी पदवी प्राप्त करणारी तहेसीन शकील काझी यांचाही गौरव करण्यात आला. दरम्यान, कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असताना मुंब्रासारख्या परिसरात अवघ्या एका लहानशा खोलीत दिवसरात्र अभ्यास करत जिद्दीने यशोशिखर गाठणाऱ्या जरीन खान हिने मनमुरादपणे संवाद साधला. दिवसा अभ्यास करणे जिकरिचे होऊ लागल्याने मध्यरात्री ऑनलाइन अभ्यास करण्याचा निर्णय घेतला व हा निर्णय माझे आयुष्य बदलवून टाकणारा ठरला, असे जरीन यावेळी म्हणाली. सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. नुर-ए-ईलाही शाह यांनी केले व आभार प्राचार्य सादीक शेख यांनी मानले.

Web Title: Girls should focus on higher education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.