इमारतीवरून उडी मारून मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:45 AM2019-07-20T00:45:57+5:302019-07-20T00:46:55+5:30
आदर्शनगर परिसरात राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पंचवटी : आदर्शनगर परिसरात राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील पेठरोड हॉटेल राऊ पाठीमागे असलेल्या श्रीकुश अपार्टमेंट येथे राहणाºया पूर्वा प्रदीप कुवर (१७) हिने रात्री साडेआठ वाजेच्या सुमाराला इमारतीच्या टेरेसवरून उडी मारली. तिला तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तब्बेत गंभीर असल्याने नंतर तिला शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे डॉ. वैभव धूम यांनी तपासून तिला मयत घोषित केले.
२५ लाखांच्या लॉटरीचे आमिष दाखवून गंडा
नाशिक : ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून एका अज्ञाताने शहरातील महिलेला तब्बल दोन लाख ८६ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला एका अज्ञाताने ‘कौन बनगे करोडपती’ या कार्यक्रमात २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगत ही रक्कम मिळविण्यासाठी काही रक्कम बँकेत भरावी लागणार असल्याचे फोनद्वारे सांगितले. तसेच व्हॉट््स अॅपद्वारे आयसीआयसीआय बँकेचा खाते नंबर पाठवून त्यावर दोन लाख ५६ हजार ५०० भरण्यास सांगितले. त्यानंतर संशयिताचा फोन बंद लागल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे संबंधित महिलेच्या सायबर पोलिसांमध्ये तक्रार केली असून, महिलेच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिचारिकेची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिकरोड : डॉ. पाटील हॉस्पिटलमध्ये एका परिचारिकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. पाटील हॉस्पिटलमध्ये नंदा हिरामण गावित (२२,रा. हरसूल) या काम आटोपल्यानंतर त्या आपल्या रूममध्ये झोपण्यास गेल्या होत्या. त्यानंतर गुरु वारी सकाळी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी गावित यांचा रूम उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.