जिल्हाभरात मुलीच ठरल्या अव्वल; करिअरच्या वाटा शोधण्याकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 08:50 PM2020-07-18T20:50:41+5:302020-07-19T00:57:05+5:30

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी/मार्च २०२० मधील बारावी परीक्षेचा निकाल आॅनलाइन पद्धतीने जाहीर झाला आहे.

Girls topped the district; The tendency to seek a career share | जिल्हाभरात मुलीच ठरल्या अव्वल; करिअरच्या वाटा शोधण्याकडे कल

जिल्हाभरात मुलीच ठरल्या अव्वल; करिअरच्या वाटा शोधण्याकडे कल

googlenewsNext

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी/मार्च २०२० मधील बारावी परीक्षेचा निकाल आॅनलाइन पद्धतीने जाहीर झाला आहे. जिल्हाभरात विविध महाविद्यालयाच्या बारावी निकालात यंदा विद्यार्थिनींनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे, तर परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात येऊन पुढील परीक्षेस सामोरे जाण्याचे आवाहनही करण्यात आले. यामुळे काही ठिकाणी ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र पहावयास मिळाले, तर करिअर निवडीसाठी विविध क्षेत्रांमधील संधींचा शोध घेण्यात येत आहे.
----------------
आरबीएच कन्या कनिष्ठ महाविद्यालय ९३ टक्के
मालेगाव : येथील आरबीएच कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा कला व विज्ञान शाखेचा बारावीचा निकाल सरासरी ९३.१२ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के, तर कला शाखेचा ८९.०१ टक्के लागला. विज्ञान शाखेतून एकूण ११७ विद्यार्थिनी परीक्षा दिली. सर्वच्या सर्व विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. रक्षा देवेंद्र शेलार (८४ टक्के) प्रथम, सृष्टी योगेश हिरे (८२.७६) द्वितीय, तर प्रांजली नागेश निकम (८०.७६) हिने तृतीय क्रमांक मिळवला. कला शाखेतील १७३ विद्यार्थिनींपैकी १५४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. यशश्री प्रशांत देशपांडे (८८.६१) प्रथम, सोपिया शकील मेमन (८४.३०) द्वितीय, अश्विनी संजय शिल्लक (७५.८४) हिने तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थिनींचे श्रीमती ए. जे. जोंधळे, उपप्राचार्य आर. जी. पाटील, पी. सी. पाटील व के. डी. पवार, सी. टी. कापडणीस आणि सर्व प्राध्यापक व सर्व शिक्षक यांनी कौतुक केले.
--------------
रु ई उच्च माध्यमिक विद्यालय
लासलगाव : रुई येथील रयत शिक्षणसंस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल ९८.४१ टक्के लागला असून, संदीप यादव वाघ (८२.४१) विद्यालयातून प्रथम आला आहे.
माधुरी शंकर होन (७४.७६), गायत्री चंद्रकांत तासकर (७२.९२) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, वैष्णवधाम रामकृष्णहरी मठाचे ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली शिंदे, शिवाजी रोटे, जगन्नाथ तासकर, त्र्यंबक चव्हाणके, कोंडाजी गायकवाड, आर. व्ही. गवळी, आरती पोटे, मीरा शिंदे, विनोद गावकर, सविता चव्हाणके, रोहिणी दरेकर, अश्विनी गवळी, पी. टी. धोंडगे, एस. जे. पाडवी, जी. एन. तेलोरे, एल. एस. डगळे आदी उपस्थित होते.
----------------
खेडगाव नवोदयचा निकाल १०० टक्के
दिंडोरी : मानव संसाधन विकास मंत्रालयद्वारा संचलित जवाहर नवोदय विद्यालय खेडगावचा बारावी व दहावीचा निकाल 100 टक्के लागला. बारावीत ८७ टक्के विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत व १०० टक्के विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तसेच दहावीत ७५ टक्के विद्यार्थी मेरीट श्रेणीत व ९५ टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. बारावीत उदय नवरे ९५.८० टक्के घेऊन प्रथम, प्रियंका साठे ९३.२० टक्के घेऊन द्वितीय व अथर्व बनकर ९३ टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तसेच दहावीत समीक्षा देवरे ९७.०४ टक्के घेऊन प्रथम, प्रथमेश निकम ९५.०८ टक्के घेऊन द्वितीय व चेतना ठोके ९५.०६ टक्के प्राप्त करून तृतीय स्थानावर उत्तीर्ण झाले. दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात ६, गणितात २ व समाजशास्त्रात १ अशा प्रकारे विद्यार्थांना १०० पैकी १०० गुण प्राप्त झाले. बारावीच्या परीक्षेत जीवशास्त्र विषयाची सरासरी ८९.९२ तर दहावीच्या परीक्षेत मराठी विषयाची सरासरी ९४.९७ अव्वल आहे.
विद्यालयाचे प्राचार्य एन. डी. ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विषय शिक्षक अनिता चौधरी, विनय सोनार, शंकर कटारिया, जालिंदर हासे,
प्रदीप वाघमारे, महेंद्रप्रताप सिंह, राजू पारडे, संपदा साधू, शुभांगी लोडम, रोहिदास वाबळे,सुरेंद्र नरड यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात शारीरिक अंतर राखत यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Web Title: Girls topped the district; The tendency to seek a career share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक