करंजाळीत मुलींनी गाजवले कुस्ती मैदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 08:53 PM2019-08-19T20:53:38+5:302019-08-19T20:56:49+5:30
पेठ : महिला खेळाडूंनी सुद्धा कुस्तीसारख्या खेळात करिअर करावे या उद्देशाने करंजाळी येथे खास शालेय मुलींसाठी कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. विशेष म्हणजे यामध्येही आदिवासी मुलींनी चांगलेच मैदान गाजवले.
पेठ : महिला खेळाडूंनी सुद्धा कुस्तीसारख्या खेळात करिअर करावे या उद्देशाने करंजाळी येथे खास शालेय मुलींसाठी कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. विशेष म्हणजे यामध्येही आदिवासी मुलींनी चांगलेच मैदान गाजवले.
सह्याद्री शिक्षण मंडळ संचालित करंजाळी येथील एम. जे. एम महाविद्यालयात फक्त मुलींसाठी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.
सदरच्या स्पर्धा १४,१७ व १९ या वयोगटातील शालेय मुलींसाठी आयोजित करण्यात आली होती.
पेठ तालुक्यातील करंजाळी, खरपडी, पेठ या भागातून ६० मुलींनी यात स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धा प्रमुख डॉ. दीपक जुंद्रे व काशिनाथ चौधरी यांनी आयोजन केले होते. निरीक्षक म्हणून तालुका क्र ीडासंयोजक चंद्रशेखर पठाडे उपस्थित होते. अर्जुन मोरे यांनी पंचाची भूमिका बजावली. याप्रसंगी मंगेश गमे, विद्याधर गवळी तसेच शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड झालेले खेळाडू
१४ वर्षे वयोगट
प्रथम - संगीता सापटे, द्वितीय - कल्पना भोम्बे, तृतीय- रविना राऊत.
१७ वर्षे वयोगट
प्रथम - जयश्री खांबाईत, द्वीतीय - आशा पालवी, तृतीय - दीपिका वाघमारे.
१९ वर्ष वयोगट
प्रथम - गीता गालट, द्वितीय - चतुर्थी पठाडे.