‘पुस्तक द्या, पुस्तक घ्या’
By admin | Published: March 25, 2017 12:10 AM2017-03-25T00:10:57+5:302017-03-25T00:11:10+5:30
नाशिक : शहरातील नागरिकांपर्यंत वेगवेगळी पुस्तके पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमाप्रमाणे ‘पुस्तक द्या, पुस्तक घ्या’ आणखी एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
नाशिक : शहरातील नागरिकांपर्यंत वेगवेगळी पुस्तके पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमाप्रमाणे ‘पुस्तक द्या, पुस्तक घ्या’ आणखी एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून वाचकांना त्यांच्याकडील पुस्तक देऊन, पुस्तक रथातील दुसरे पुस्तक कोणत्याही शुल्काविना मिळणार आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारात नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम व पुस्तक विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अतुल पवार यांच्या हस्ते विनायक रानडे यांच्या ‘पुस्तक द्या, पुस्तक घ्या’ उपक्रमासोबत जनस्थान पुस्तक रथाचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी कला व साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. विनायक रानडे म्हणाले, या रथामध्ये मित्रपरिवार आणि साहित्यक्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिलेली सुमारे पाचशेहून अधिक पुस्तके आहेत. वाचकाने यातील त्याला आवडलेले कोणतेही पुस्तक घेऊन जावे; मात्र त्यासाठी वाचकाने त्याच्याकडे असलेले कोणतेही एक पुस्तक ग्रंथरथात देऊन जावे. त्यामुळे दुसऱ्या वाचकालाही असाच नवीन पुस्तक मिळविण्याचा आनंद प्राप्त करता येईल. (प्रतिनिधी)