मागासवर्गियांवरील हल्ले प्रकरण सीबीआयकडे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 04:28 PM2020-06-27T16:28:08+5:302020-06-27T16:29:17+5:30
भारिपची मागणी : तहसीलदारांना निवेदन सादर
येवला : राज्यात मागासवर्गीयांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढते असून या प्रकरणात पोलीस जलद गतीने कारवाई करीत नाही. मागासवर्गीय हल्ल्यांची प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करून जलदगती न्यायालयात सदर प्रकरणे चालवावीत व पीडीतांना न्याय द्यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने एका निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे.
स्थानिक स्तरावर शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसिलदार रोहिदास वारूळे यांना सदर मागणीचे निवेदन देण्यात आले. मागासवर्गीय हल्ला प्रकरणातील स्थानिक पोलिसांचीही चौकशी होणे आवश्यक असून, भाजपच्या काळात मागासवर्गीय समाजाची होणारी दडपशाही आघाडी काळातही सुरूच असल्याने दिवसेंदिवस राज्यात दलितांवरील हल्ल्यात वाढ होत आहे. हल्लेखोरांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने मागासवर्गीयांवर अन्याय होत असल्याचे, सदर निवेदनात म्हटले आहे. मागासवर्गीयांवरील हल्ल्याची प्रकरणे स्थानिक पोलीस प्रशासनाकडून सीबीआय कडे वर्ग करण्यात यावी, पीडित व पीडितांच्या कुटुंबायांना न्याय मिळवून देण्या संदर्भात सदर प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवावी, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.निवेदनावर भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांच्यासह समाधान धिवर, राजू गुंजाळ, दयानंद जाधव आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षºया आहेत.