झोपडपट्टीवासीयांना घरे नावावर करुन दिलासा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:14 AM2021-03-20T04:14:47+5:302021-03-20T04:14:47+5:30
सिन्नर : सिन्नर शहरातील झोपडपट्टीवासीयांची घरे त्वरित नावावर करा. काही अडचणी असल्यास शासनाला प्रस्ताव पाठविण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या ...
सिन्नर : सिन्नर शहरातील झोपडपट्टीवासीयांची घरे त्वरित नावावर करा. काही अडचणी असल्यास शासनाला प्रस्ताव पाठविण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली. पंधरा वर्षांपासून नगरपालिका प्रशासनाने अनेक स्वप्न दाखवली. आज मात्र जागोजागी रस्त्यांची, गटारींची दुरवस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांची व गटारींची लांबी, रुंदी मोजून कामाची चौकशी करावी. चोवीस तास नागरिकांना पाणी देऊ अशी घोेषणा केली. मात्र अजूनही योजना पूर्ण झाली नसल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल होत आहे. पाणीपुरवठा योजनेची सुरुवातीपासूनच्या कामाची तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून सिन्नरकरांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र स्वरुपात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष कैलास दातीर, शहराध्यक्ष राहुल इनामदार, तालुका कामगार अध्यक्ष मुकुंद खर्जे, चंद्रकांत डावरे, कपिल कोठूरकर, नागेश कोथमिरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-----------------
सिन्नर येथे नायब तहसीलदार दत्ता जाधव यांना मागण्यांचे निवेदन देताना कैलास दातीर, राहुल इनामदार, मुकुंद खर्जे आदी. (१९ सिन्नर २)
===Photopath===
190321\19nsk_12_19032021_13.jpg
===Caption===
१९ सिन्नर २