ग्रामपंचायत सदस्यांना मुदतवाढ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:21 PM2020-05-24T22:21:08+5:302020-05-24T22:21:27+5:30
जून ते आॅगस्टदरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तत्काळ घ्याव्यात, निवडणूक घेण्यास सरकार तयार नसेल तर आहे त्या सदस्यांना निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सरपंच सेवा महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव यांच्याकडे ई-मेल निवेदनाद्वारे केली आहे.
येवला : जून ते आॅगस्टदरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तत्काळ घ्याव्यात, निवडणूक घेण्यास सरकार तयार नसेल तर आहे त्या सदस्यांना निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सरपंच सेवा महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव यांच्याकडे ई-मेल निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १५७० ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलून ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहे, ही बाब चुकीची आहे. निवडणूक सरकारने थांबवली, तर मुदतवाढही सरकारने दिली पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे. जून ते आॅगस्टदरम्यान मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुका तत्काळ घ्याव्यात, निवडणूक घेण्यास सरकार तयार नसेल, तर आहे त्या सदस्यांना निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ द्यावी, तसेच गर्दी टाळण्यासाठी निवडणूक प्रक्रिया गावातच राबवावी, सामाजिक अंतर न ठेवणाºया सभासदांवर कारवाई करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील, सोशल मीडिया राज्य प्रमुख भाऊसाहेब कळसकर, राज्य कार्याध्यक्ष माधव गंभिरे, कोअर कमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, मानद अध्यक्ष चंद्रकांत बधाले, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, राज्य सल्लागार हनुमंता सुर्वे, राज्य संघटक आण्णासाहेब जाधव, महिला राज्य उपाध्यक्ष वंदना गुंजाळ, दक्षिण महाराष्ट्र प्रसिद्धप्रमुख रामनाथ बोराडे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, राज्य सचिव सुनील रहाटे, सदस्य सदाशिव ढेंगे, मंगेश तायडे आदींच्या स्वाक्षºया आहेत.