कीर्तनकार, कलावंतांना आर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:18 AM2021-09-05T04:18:08+5:302021-09-05T04:18:08+5:30
जिल्हा नाशिकचे जिल्हा सचिव नवनाथ महाराज गांगुर्डे, जिल्हा मार्गदर्शक राजेंद्र महाराज काळे, संजय आव्हाड, चांदवड तालुका अध्यक्ष सचिव श्याम ...
जिल्हा नाशिकचे जिल्हा सचिव नवनाथ महाराज गांगुर्डे, जिल्हा मार्गदर्शक राजेंद्र महाराज काळे, संजय आव्हाड, चांदवड तालुका अध्यक्ष सचिव श्याम महाराज गांगुर्डे, सचिव निळोबा महाराज बोरसे, गंगाधर महाराज गांगुर्डे, सचिन महाराज ठाकरे, कैलास खैरे, रवींद्र महाराज कोतवाल, अविनाश अहिरे, संतोष महाले, विलास गांगुर्डे, समाधान महाराज ठाकरे, श्यामराव महाराज गांगुर्डे आदी वारकरी उपस्थित होते. दि. १ ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे वारकरी कलावंत मानधनासाठी शासनाकडे मागणी केली. त्यात गेल्या दोन वर्षांपासून कोविड महामारीद्वारे भजन, कीर्तन, प्रवचन, भागवत, रामायण, शिवकथा या माध्यमांतून धार्मिक, समाजप्रबोधन, साप्ताहिक, अखंड हरिनाम सप्ताह असे कार्यक्रम बंद असल्याने वारकरी कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिषदेतर्फे संतविचार जनमानसात रुजवून सुसंस्कृत आदर्श समाज घडविण्याचे कार्य अविरतपणे करीत आहोत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन यामुळे सर्व मंदिरे व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व कलावंत यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. याचा विचार करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी घोषित केलेल्या वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार यांना आर्थिक मदत प्रत्येकी पाच हजार मिळावी तसेच त्यांच्या नावाची यादी प्रसिद्ध नसल्याने निवेदनासोबत जोडलेल्या यादीचा आधार घेत त्यांच्या नावाची नोंद होऊन मदत मिळावी, असे निवेदनात म्हटले आहे.
फोटो - ०४चांदवड वारकरी
चांदवड तालुका वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देताना नवनाथ गांगुर्डे, राजेंद्र काळे, संजय आव्हाड, श्याम गांगुर्डे, निळोबा बोरसे, कैलास खैरे आदी.
040921\04nsk_18_04092021_13.jpg
चांदवड तालुका वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनेतहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देतांना नवनाथ गांगुर्डे, राजेंद्र काळे, संजय आव्हाड, शाम गांगुर्डे, निळोबा बोरसे, कैलास खैरे आदी.