कोरोनामुळे अनाथ बालकांना पाच लाखांची मुदत ठेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:15 AM2021-07-30T04:15:12+5:302021-07-30T04:15:12+5:30

नाशिक: कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनाला मदत व्हावी यासाठी शासनाच्या आदेशानुसार देय असलेल्या अनुदानाची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. ...

Give five lakh to orphans due to corona | कोरोनामुळे अनाथ बालकांना पाच लाखांची मुदत ठेव

कोरोनामुळे अनाथ बालकांना पाच लाखांची मुदत ठेव

Next

नाशिक: कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनाला मदत व्हावी यासाठी शासनाच्या आदेशानुसार देय असलेल्या अनुदानाची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यातील २४ बालकांना या योजनेतून ५ लाख रुपयांचे साहाय्य मुदत ठेवीच्या रूपात मंजूर करण्यात आले.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालकांचा मृत्यू झाला आहे अशा शून्य ते

१८ वर्षापर्यंतच्या २४ बालकांना प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचे साहाय्य मुदत ठेवीच्या स्वरूपात

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बालकांची काळजी व

संरक्षण कृतीदलाच्या आढावा बैठकीत मंजूर करण्यात आले. बालकांच्या संगोपनासाठी

बालसंगोपन निधीच्या माध्यमातून तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशा

सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या या बैठकीत

याबाबतचा निर्णय घेण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी

अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, विधी व सेवा

प्राधिकरणाचे न्यायाधीश प्रसाद कुलकर्णी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा

पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. के. आर. श्रीवास, महानगरपालिका आरोग्य

अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा शुभांगी

बेळगावकर, जिल्हा बाल संरक्षण समितीचे समन्वयक गणेश कानवडे, परिविक्षा अधिकारी

योगीराज जाधव यांच्यासह नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना काळात एक किंवा दोन्ही पालक

गमावलेल्या बालकांचे सर्वेक्षण करताना ज्या बालकांचा सांभाळ त्यांचे नातेवाईक करत

असतील त्यांच्या एकूण आर्थिक परिस्थितीचादेखील विचार करण्यात यावा. याअंतर्गत

अनाथ झालेल्या बालकांचा सांभाळ करणाऱ्या ज्या नातेवाइकांची आर्थिक परिस्थिती

बेताची असेल, अशा बालकांना स्वयंसेवी संस्थांच्या बालकाश्रमात ठेवण्यासाठी

नातेवाइकांचे समुपदेशन करण्यात यावे, जेणेकरून संबंधित बालकांचा सर्वांगीण विकास

होऊन त्यांचे पालन व्यवस्थितरित्या होण्यासाठी मदत होईल. जे नातेवाईक अथवा

कुटुंबातील सदस्य बालकांचे संगोपन करण्यासाठी इच्छुक नाहीत अशा बालकांनादेखील

बालगृहात दाखल करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी

मांढरे यांनी यावेळी सांगितले.

अशा बालकांच्या पुनर्वसन व सर्वांगीण विकासासाठी संबंधित बालक व जिल्हा माहिला व

बाल विकास अधिकारी यांच्या नावे सामायिक बँक खात्यावर एकरकमी ५ लाख रुपये

मुदत ठेवीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याने जिल्हा माहिला व बाल विकास यंत्रणेने

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक सर्व कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनांचा लाभ या बालकांना होण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचनादेखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.

प्रशासनाकडून अशा सर्व बालकांचा शोध जरी घेतला जाणार असला तरी नागरिकांनादेखील याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी तातडीने संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.

-- पालक गमावलेल्या मुलांची संख्या ८६१

जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे पालक गमावलेली एकूण ८६१ बालके असून त्यापैकी शून्य ते

१८ वयोगटातील २४ बालकांनी आपली दोन्ही पालक गमावली असून याच वयोगटातील

७७८ बालकांनी एक पालक गमावले आहे. त्याचप्रमाणे १९ ते २३ वर्षे वयोगटातील ९

बालकांनी दोन्ही पालक तर याच वयोगटातील ५० बालकांनी आपले एक पालक गमावले

आहेत. यातील ३९६ बालकांना बाल संगोपन योजनांचा लाभ मंजूर करण्यात आला असून

वारस नोंदणी व शिधापत्रिकांच्या लाभासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेखा पाटील यांनी बैठकीत सादर केली.

Web Title: Give five lakh to orphans due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.