वनविभागातील कामे स्थानिकांना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 06:45 PM2021-04-05T18:45:59+5:302021-04-05T18:46:34+5:30
ममदापुर : येथील शेकडो एकर वनक्षेत्रावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करून जलसंधारण व मृद संधारणाची अनेक कामे केली जात असून सदर कामांमध्ये स्थानिकांना डावलण्यात येत असल्याने येथील स्थानिक नागरिकांमधे नाराजीचा सुर आहे. वनहद्दीमध्ये अनेक विकासात्मक कामे होणे ही बाब समाधानाची असली तरी, येथील स्थानिक मजुरांना त्यामध्ये सहभागी करून न घेतल्याने त्यांच्यावर कामाच्या शोधात इतरत्र भटकण्याची वेळ आली आहे.

वन विभागात सुरू असलेले अनेक कामांपैकी अकुशल मनुष्यबळाची कामे येथील स्थानिक आदिवासी बांधवांना उपलब्ध करून देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन, वन परिक्षेत्र अधिकारी यांना वनरक्षक ममदापूर यांच्यामार्फत देण्यात आले.
सदर प्रसंगी सरपंच सयाजी गुडघे, गोरख वैद्य, भाऊसाहेब सोनवणे, हरिभाऊ सोनवणे, घमा मोरे, गंगाराम मोरे, सुनील ठाकरे, सतीश ठाकरे, विजय मोरे, शंकर माळी, बापू मोरे, संपत मोरे, मुन्ना मोरे, देविदास पवार, एकनाथ मोरे, बापू सोनवणे, रवी सोनवणे, भाऊराव ठाकरे आदी उपस्थित होते.
वन विभागात सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत वन व्यवस्थापन समित्या व ग्रामसभा यांना विचारात घेत स्थानिक घटकांना अधिकाधिक सहभागी करून घेतल्यास त्यांचीही जंगला प्रती आपुलकी वाढून शासनाचा उद्देश साध्य होईल.
- गोरख वैद्य, ममदापूर.