शिधा पत्रिका नसलेल्या मजुरांना मोफत धान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 09:14 PM2021-05-18T21:14:36+5:302021-05-19T00:51:27+5:30

सटाणा : आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत शहरातील मोलमजुरी करणाऱ्यांना शिधा पत्रिकेची अट वगळून मोफत धान्य द्यावे, अशी मागणी नगरसेविका सुरेखा बच्छाव यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना सादर केले.

Give free grain to laborers who do not have ration cards | शिधा पत्रिका नसलेल्या मजुरांना मोफत धान्य द्या

आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत मोलमजुरी करणाऱ्यांना मोफत धान्य द्यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना सादर करतांना नगरसेविका सुरेखा बच्छाव.

googlenewsNext
ठळक मुद्देसटाणा : मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर

सटाणा : आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत शहरातील मोलमजुरी करणाऱ्यांना शिधा पत्रिकेची अट वगळून मोफत धान्य द्यावे, अशी मागणी नगरसेविका सुरेखा बच्छाव यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना सादर केले.

कोविड -१९ या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व प्रकारची कामे, व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे गरीब नागरिकांना उदरनिर्वाह करण्यास असंख्य अडचणी निर्माण होत आहेत .त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बहुतांश मजुरांकडे शिधा पत्रिका नाहीत. ते शासनाच्या मोफत धान्य योजनेपासून वंचित राहात आहेत. अशा नागरिकांना तसेच परराज्यातून व इतर शहरातून कामानिमित्त आलेल्या नागरिकांना देखील आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत मोफत धान्य मिळावे असे बच्छाव यांनी निवेदनात म्हटले आहे.
 

Web Title: Give free grain to laborers who do not have ration cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.