गरिबांना मोफत औषधे द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 09:28 PM2020-07-27T21:28:50+5:302020-07-27T23:26:14+5:30

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. याबाबत शहरातील डाव्या आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी मांढरे यांनी प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Give free medicine to the poor | गरिबांना मोफत औषधे द्यावी

गरिबांना मोफत औषधे द्यावी

googlenewsNext
ठळक मुद्देनिवेदन : डाव्या आघाडीच्या नेत्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. याबाबत शहरातील डाव्या आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी मांढरे यांनी प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
समाजातील घटकांनी या काळात अधिक मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. डावे पक्ष व किसान सभा, कामगार संघटना करत असलेल्या मदतकार्याबाबतची माहिती जिल्हधिकाºयांना देण्यात आली. शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांचीही भेट घेऊन अडचणींबाबत विचार-विनिमय केला. मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी चर्चा करून शहरात असलेल्या परिस्थितीबाबत जलद गतीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी, अशी विनंती करून त्यांना सूचनांचे निवेदन देण्यात आले. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका गेल्या तीन महिन्यांपासून अथक परिश्रम घेत आहेत. त्यांच्या मदतीला त्वरित कर्मचारी भरती करण्यात यावी. कोरोना उपचाराबाबत संभ्रम आहे, याबाबत जनतेला योग्य पद्धतीने माहिती मिळावी यासाठीची हेल्पलाइन अधिक सक्षम करण्यात यावी, मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेशा संख्येने सुरक्षा साधनांसह कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावेत आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
शिष्टमंडळात कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, शेतकरी कामगार पक्षनेते माजी उपमहापौर अ‍ॅड. मनीष बस्ते, भाकपचे राज्य सचिव राजू देसले, माजी नगरसेवक अ‍ॅड. तानाजी जायभावे आदींचा समावेश होता. कोरोना रुग्णांना अत्यवस्थ झाल्यास जे इंजेक्शन द्यावे लागतात ते अत्यंत महागडे आहे. गरीब व मध्यमवर्गातील रुग्णांना इंजेक्शन बाहेरून घेणे परवडत नाही. या आजारावर उपचारासाठी लागणारे औषधे व इंजेक्शन शासनातर्फे व महापालिकेच्या वतीने मोफत उपलब्ध करून देण्यात यावे.

Web Title: Give free medicine to the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.