अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:14 AM2021-03-28T04:14:47+5:302021-03-28T04:14:47+5:30
नाशिक जिल्हा काेरोनाचा हॉटस्पॉट झाला असून, त्याला अटकाव करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे. अनेक रूग्णांना शासकीय ...
नाशिक जिल्हा काेरोनाचा हॉटस्पॉट झाला असून, त्याला अटकाव करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे. अनेक रूग्णांना शासकीय रूग्णालयात व खासगी रूग्णालयात देखील खाटा मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्याच बरोबर लसीकरणासाठी डोस देखील पुरेसे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात मनपा आयुक्तांशी आपण चर्चा केली असून, मंगळवारपर्यंत दोनशे खाटा अद्यावत सामुग्रीसह उपलब्ध होतील असे आश्वासन त्यांनी दिल्याचे दरेकर यांनी सांगितले. महाराष्ट्राला कोरोना लस मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असे सांगून लॉकडाऊन करणे हा सर्वस्वी उपाय नसून त्यातून मध्यम मार्ग काढण्यात यावा असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहूल आहेर, गिरीष पालवे, लक्ष्मण सावजी आदी पदाधिकारी उपस्थित होते.