कांदा उत्पादकांना पाचशे कोटींचे पॅकेज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 09:41 PM2020-08-13T21:41:48+5:302020-08-13T23:47:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कळवण : एकीकडे कांदा भावात झालेली घसरण, तर दुसरीकडे कष्ट करून पिकवलेला कांदा चाळीतच सडत असल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : एकीकडे कांदा भावात झालेली घसरण, तर दुसरीकडे कष्ट करून पिकवलेला कांदा चाळीतच सडत असल्याने केंद्र व राज्य शासनाने मिळून महाराष्टÑातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाचशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्टÑ राज्य कांदा उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांनी केली आहे.
राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी व व्यापाऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला. सद्यस्थितीत कांदा चाळीमधील कांद्याची स्थिती, बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळणारा दर याविषयी कांदा उत्पादक शेतकºयांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. मागील चार ते पाच महिन्यांपासून कोरोनामुळे देशात सुरू असलेल्या सततच्या लॉकडाऊन व कांदा निर्यातीवर आलेल्या मर्यादा तसेच देशांतर्गत कांद्याला मिळणारा कवडीमोल दर यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांना मोठ्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे उत्पादन खर्चापेक्षाही निम्म्या दराने कांदा विकण्याची वेळ शेतकºयांवर आलेली असताना दुसºया बाजूला कांदा निम्म्यापेक्षाही जास्त कांदाचाळींमध्येच सडत असल्याने शेतकºयांचे दुहेरी नुकसान होत आहे. केंद्र व राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेत असून, आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकांना दोन्ही सरकारने मिळून पाचशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कळवण बाजार समितीत सचिव रवींद्र हिरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी संपर्कप्रमुख कुबेर जाधव, प्रदेश संघटक कृष्णा जाधव, जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, कळवण तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, दुष्यंत पवार, शिवाजी पवार, ओंकार पाटील, बाजार समिती संचालक सुनील देवरे, घनश्याम पवार उपस्थित होते...तर प्रशासनाच्या दारात ओतणार कांदाकांदा उत्पादक शेतकºयांच्या मागण्या त्वरित मान्य करून शेतकºयांचे नुकसान रोखण्यासाठी तातडीने पॅकेजची घोषणा न झाल्यास आगामी काळात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर व तालुका स्तरावर तहसीलदार कार्यालयाबाहेर कांदे ओतून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिघोळे यांनी दिला.