होमिओपॅथीला राजाश्रय द्यावा : विक्रम काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:23 AM2018-11-20T00:23:28+5:302018-11-20T00:23:53+5:30
होमिओपॅथीला अन्य पॅथींच्या तुलनेत समान दर्जा प्राप्त होण्यासाठी सरकारने अॅलोपॅथीच्या विविध समस्या सोडविण्यासोबतच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर किमान दोन हॉमिओपॅथीच्या डॉक्टरांची नियुक्ती अनिवार्य करून होमिओपॅथीला राजाश्रय द्यावा, असे आवाहन आमदार विक्रम काळे यांनी केले आहे.
नाशिक : होमिओपॅथीला अन्य पॅथींच्या तुलनेत समान दर्जा प्राप्त होण्यासाठी सरकारने अॅलोपॅथीच्या विविध समस्या सोडविण्यासोबतच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर किमान दोन हॉमिओपॅथीच्या डॉक्टरांची नियुक्ती अनिवार्य करून होमिओपॅथीला राजाश्रय द्यावा, असे आवाहन आमदार विक्रम काळे यांनी केले आहे. रावसाहेब थोरात सभागृहात महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद, मुंबई यांच्यातर्फे सोमवारी (दि. १९) राज्यस्तरीय चर्चाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या चर्चासत्राचे उद्घाटन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप म्हैसेकर यांनी केले. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, डॉ. धनाजी बागल, डॉ. अरुण भस्मे, डॉ. शांतीलाल देसरडा, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र ठाकरे आदी उपस्थित होते. यावेळी विक्रम काळे यांनी, होमिओपॅथी प्रवेशासाठी नीट परीक्षेतील गुणवत्तेची अट रद्द करावी असे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विलास कांगणे यांनी केले. डॉ. नितीन गावडे यांनी आभार मानले.
अहवालासाठी पाठपुरावा
होमिओपॅथीच्या डॉक्टरांना विविध समस्या व मागण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या डॉ. सावरीकर समितीच्या प्रसिद्धीसाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असून, विधीमंडळाच्या अधिवेशनातही होमिओपॅथी डॉक्टरांच्या समस्या मांडणार असल्याचे आश्वासन काळे यांनी दिले.
संशोधनासाठी तीन कोटी
आरोग्य विज्ञानातही प्रत्येक पॅथीची स्वतंत्र अशी गुणवैशिष्टे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी होमिओपॅथी व अॅलोपॅथी अशी तुलना न करता आपल्या शाखेत प्रामाणिकपणे काम करीत आपल्या शाखेची गुणवैशिष्ट्ये जपण्याचा सल्ला कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.