दुसरी लस घेणाऱ्यांना प्राधान्यक्रम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:58+5:302021-07-11T04:11:58+5:30

भुजबळ यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. १०) येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्य:स्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक स्वामी ...

Give priority to other vaccinators | दुसरी लस घेणाऱ्यांना प्राधान्यक्रम द्या

दुसरी लस घेणाऱ्यांना प्राधान्यक्रम द्या

Next

भुजबळ यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. १०) येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्य:स्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक स्वामी रिसॉर्ट, लासलगाव येथे पार पडली. त्या वेळी ते बोलत होते.

भुजबळ यांनी सांगितले, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजनांबाबत आराखडा तयार करण्यात यावा. लसीकरणाबाबत अधिक केंद्रे वाढविण्याबाबत नियोजन करण्यात यावे. तसेच ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर तातडीने बसविण्यात यावेत. शासकीय रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करावी. लग्न समारंभास परवानगी देताना शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. तालुक्यात व शहरात गृह विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांची वेळोवेळी तपासणी करावी. ज्या गृह विलगीकरणात रुग्णांची व्यवस्था पुरेशी नसेल, अशा रुग्णांना तातडीने रुग्णालयात स्थलांतरित करण्यात यावे. जिल्हा व तालुक्यातील बाजार समिती यांनीसुद्धा बाजार समितीमध्ये नागरिकांना प्रवेश देतेवेळी योग्य दक्षात घ्यावी, असेही भुजबळ यांनी सांगितले. या वेळी लासलगाव ग्रामपंचायतचे सरपंच तथा मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ थोरे, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, प्रांताधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, निवासी वैद्यकीय अधिकारी खैरे आदी उपस्थित होते.

इन्फो

पीक परिस्थितीचा आढावा

भुजबळ यांनी या वेळी पीक परिस्थितीचादेखील आढावा घेतला. जिल्ह्यात पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी आगामी पावसाचा अंदाज घेऊनच, आवश्यक ती पेरणी करावी. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. युरिया व खते यांचा मुबलक साठा उपलब्ध करून ठेवल्यास आगामी काळात त्याचा तुटवडा भासणार नाही, त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही भुजबळ यांनी केल्या.

फोटो- १० भुजबळ लासलगाव

लासलगाव येथे कोरोना आढावा बैठकीत बोलताना छगन भुजबळ. समवेत अधिकारी व पदाधिकारी.

100721\10nsk_44_10072021_13.jpg

फोटो- १० भुजबळ लासलगाव लासलगाव येथे कोरोना आढावा बैठकीत बोलताना छगन भुजबळ. समवेत अधिकारी व पदाधिकारी. 

Web Title: Give priority to other vaccinators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.