व्यावसायिकांना कमी दरात गाळे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 12:28 AM2020-09-19T00:28:15+5:302020-09-19T01:33:13+5:30
त्र्यंबकेश्वर : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यात अग्रगण्य बाजार समिती असून, त्र्यंबकेश्वर येथे उपबाजार आवार उपलब्ध करून दिल्याने तालुक्यातील स्थानिक व कमी उत्पन्न असणाऱ्या व्यावसायिकांना कमी दरात गाळे उपलब्ध करून द्यावेत, असे प्रतिपादन पालकमंत
त्र्यंबकेश्वर : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यात अग्रगण्य बाजार समिती असून, त्र्यंबकेश्वर येथे उपबाजार आवार उपलब्ध करून दिल्याने तालुक्यातील स्थानिक व कमी उत्पन्न असणाऱ्या व्यावसायिकांना कमी दरात गाळे उपलब्ध करून द्यावेत, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
त्र्यंबकेश्वर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवार इमारतीचे भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे यांनी केले. यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, देवीदास पिंगळे, युवराज कोठुळे, गोकुळ पिंगळे, नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, विनायक माळेकर, पं. स. सभापती मोतीराम दिवे, कैलास चोथे, तुकाराम पेखळे, प्रभाकर मुळाणे आदी उपस्थित होते. या देशात उत्पादन करणाºया मालकाला आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार असतो, पण शेतकऱ्यांना मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नसतो. शेतकºयांनी शेती पिकवण्याचे लॉकडाऊन केले तर आपण काय खाऊ, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.