पंजाबप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:17 AM2021-09-22T04:17:14+5:302021-09-22T04:17:14+5:30
कोट- नोटबंदी, गारपीट, कोरोना आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे मागील पाच वर्षांपासून राज्यातील शेतकरी पूर्णपणे अडचणीत आले आहेत. पंजाबात वीज ...
कोट-
नोटबंदी, गारपीट, कोरोना आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे मागील पाच वर्षांपासून राज्यातील शेतकरी पूर्णपणे अडचणीत आले आहेत. पंजाबात वीज बिल माफीचा निर्णय महाराष्ट्रातही काँग्रेसने राबवावा आणि राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा - कैलास भोसले, कोषाध्यक्ष , राज्य द्राक्ष बागायतदार संघ
कोट-
पंजाबात पाच-सहा महिन्यांनी निवडणुका आहेत. यामुळे काँग्रेसने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला आहे. यापूर्वी महाराष्ट्रातही शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी वीज बिल माफीची घोषणा केली होती पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. कोणताही राजकीय पक्ष असो तो शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांची मते पदरात पाडून घेत असतो. काँग्रेसने महाराष्ट्रातही तो निर्णय राबवावा. - शंकर पुरकर, जिल्हाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष
कोट-
महाराष्ट्रात राज्य सरकारने यापूर्वीच वीज बिल माफीचा निर्णय घ्यायला हवा होता. महाराष्ट्रात काँग्रेसकडे ऊर्जा खाते असल्यामुळे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी या निर्णयाची अंमलबजावणी करावी - शिवाजी म्हस्के, शेतकरी, पळसे
कोट-
महाराष्ट्रात शेकडा एक ते दोन टक्के शेतकरी सधन आहेत. उर्वरित शेतकरी सर्वसामान्य असून अनेकांचा संपूर्ण उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असतो. नुकसान झाले तर त्यांच्या अडचणीत वाढ होत असते. यासाठी महाराष्ट्रातही शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा - शिवराम गायधनी, संचालक, नाशिक हनीबी फार्म्स प्रोड्युसर कं.
कोट-
महाराष्ट्रात राजकीय स्थिती वेगळी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे असून सरकारमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा आहे. यामुळे काँग्रेसला निर्णय घेताना अडचणी जरी आल्या तरी प्रसंगी काँग्रेसने शेतकरी हिताचा निर्णय घेऊन हा दबदबा झुगारून वेळप्रसंगी सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा द्यावा व हा निर्णय महाराष्ट्रातही लागू करायला हवा. - शिवनाथ जाधव, प्रदेशाध्यक्ष, रयत क्रांती संघटना
(सर्व फोटो नावाने दिलेले आहेत. )