वंचीतांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या: भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 12:07 AM2020-09-18T00:07:50+5:302020-09-18T01:26:36+5:30
नाशिक- मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नाही मात्र दलीत, आदीवासी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्क ा लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, अशी सर्वच पक्षांची भूमिका असल्याचे मत ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतिरिम स्थगिती आणि त्यानंतर आरक्षणासाठी पुन्हा होऊ घातलेली आंदोलने या पार्श्वभूमीवर भुजबळ यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर सांगितले की, अन्य आरक्षणांना धक्का न लावता या समाजाला आरक्षण दिले पाहिजे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले पाहिजे, ओबीसींचे २७ टक्के नाही तर १९ टक्के आरक्षण आहे.
त्यात सहा कोटींचा समाज आहे, असे सांगून त्यांनी ओबीसी समाजाला देखील आधिक आरक्षण द्यायला हवे असे मत व्यक्त केले. सर्वाेच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू असताना केंद्र शासनाने देखील वकील नियुक्त करणे आवश्यक होते. कारण केंद्र सरकारने दहा टक्के आरक्षण वाढवले आहे, असे सांगून भाजपने यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे भुजबळ म्हणाले. मराठा
आरक्षणाचा कायदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलाय, मात्र मी त्यांना दोष देतो असे नाही, मराठा समाजाला सर्वांनीच न्याय द्यायला हवा असे ते म्हणाले.