सलून व्यावसायिकांना प्रतिमाह २० हजार रुपये द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:14 AM2021-04-10T04:14:06+5:302021-04-10T04:14:06+5:30

सिन्नर : सलून व ब्युटीपार्लर बंदचे शासकीय आदेश मागे घेण्याबाबत अथवा प्रत्येकी महिना २० हजार रुपये उपजीविकेसाठी मदत म्हणून ...

Give Rs 20,000 per month to salon professionals | सलून व्यावसायिकांना प्रतिमाह २० हजार रुपये द्या

सलून व्यावसायिकांना प्रतिमाह २० हजार रुपये द्या

Next

सिन्नर : सलून व ब्युटीपार्लर बंदचे शासकीय आदेश मागे घेण्याबाबत अथवा प्रत्येकी महिना २० हजार रुपये उपजीविकेसाठी मदत म्हणून देण्याची मागणी सिन्नर तालुका नाभिक महामंडळातर्फे करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन केले आहे. दिनांक ५ एप्रिलपासून सरकारने सलून व ब्युटीपार्लर व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश जारी केला. सरकारने नाभिक समाजाला विश्वासात न घेता, कुठलीही मदत जाहीर न करता सलून व्यवसायावर निर्बंध घातल्याने संघटनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या मागणीचा विचार न केल्यास तालुक्यात एकाच दिवशी सर्व दुकाने सुरू करू, अशा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

नाभिक समाजाचे हातावर पोट असून, ९० टक्के सलून दुकाने भाडेतत्त्वावर असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालत आहे. सलून बंद केल्यामुळे समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. गतवर्षी झालेल्या लॉकडाऊनमध्ये १६ समाजबांधवांनी आत्महत्या केली होती, त्यांच्या कुटुंबांना सरकारने कोणतीही मदत केलेली नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर महामंडळाचे जिल्हाध्यक्ष रमेश बिडवे, तालुकाध्यक्ष राजेंद्र बिडवे, संदीप व्यवहारे, दत्ता पंडित, संकेत वैद्य, बाळासाहेब कडवे, महेंद्र कानडी, किरण दळवी, सोमेश्वर भालेराव, जगन्नाथ बिडवे, दत्ता पंडित, वाल्मीक शिंदे, केशव पंडित आदींसह समाजबांधवांच्या सह्या आहेत.

फोटो - ०९ सिन्नर सलून

सिन्नरला सलून, ब्युटीपार्लर सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदारांना नाभिक महामंडळातर्फे समाजाचे पदाधिकाऱ्यांनी दिले.

===Photopath===

090421\09nsk_12_09042021_13.jpg

===Caption===

फोटो - ०९ सिन्नर सलून सिन्नरला सलून, ब्यूटिपार्लर सुरू करण्याच्या मागणीचे नायब तहसिलदारांना नाभिक महामंडळाच्या वतीने निवेदन देताना समाजाचे पदाधिकारी. 

Web Title: Give Rs 20,000 per month to salon professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.