साऊंड सिस्टीम, लाईट, जनरेटर व्यावसायिकांना विशेष पॅकेज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:31 AM2020-12-12T04:31:46+5:302020-12-12T04:31:46+5:30
नाशिक : विवाह सोहळे, धार्मिक समारंभ तसेच विविध सामूहिक कार्यक्रमांविषयी असलेल्या जाचक अटी वगळून साऊंट सिस्टीमसह विविध सोहळ्यांना परवानगी ...
नाशिक : विवाह सोहळे, धार्मिक समारंभ तसेच विविध सामूहिक कार्यक्रमांविषयी असलेल्या जाचक अटी वगळून साऊंट सिस्टीमसह विविध सोहळ्यांना परवानगी मिळण्यासाठी जिल्हा साऊंड, लाईटस आणि जनरेटर असोसिएशनतर्फे व्यावसायिकांच्या विविध समस्यांविषयी पालकमंत्री छगन भुजबळ यांना छावा क्रांतिवीर सेनेतर्फे शुक्रवारी (दि. ११) निवेदन देण्यात आले.
कोरोनाच्या काळात सर्व प्रकारचे व्यवसाय हे बंद झाले आहे. हातावर पोट असणाऱ्या सामान्यांचे अतोनात हाल झाले असून, या कोरोनाच्या संकटात साऊंड सिस्टीम चालक-मालकदेखील भरडले गेले आहेत. राज्य सरकारने विविध प्रकारचे पॅकेज जाहीर करून गरजूंना वेगवेगळ्या प्रकारची मदत केली; परंतु यात साऊंड सिस्टीमधारकांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्यामुळे साऊंड सिस्टीम व लाईट व जनरेटर असोसिएशनच्या समस्यांविषयी राज्य सरकारला जाणीव करून देत साऊंड लाईट जनरेटर व्यवसाय कोरोना काळात जाचक अटी वगळून सुरळीत चालू करण्यास परवानगी देण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेना सलग्न जिल्हा साऊंड, लाईटस आणि जनरेटर असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.
साऊंड सिस्टीम व त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांच्या मागे प्रत्येकी ५ कामगार काम करतात. त्यांचा विचार करून राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर करून या व्यावसायिकांना मदत करण्याची मागणीही छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशनचे पदाधिकारी व व्यावसायिकांच्या प्रतिनिधी मंडळाने या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. यावेळी असोसिएशनचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रदीप बडदे, मयूर वाघ, मनीष संसारे, नीरज गवारे, राहुल ताजनपुरे, विशाल पठाडे आदी उपस्थित होते.
(आरफोटो- ११साऊंड सिस्टीम) पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देताना छावा क्रांतिवीर संघटनेच संस्थापक अध्यक्ष करण गायकर. समवेत प्रदीप बडदे, मयूर वाघ, मनीष संसारे, नीरज गवारे, राहुल ताजनपुरे, विशाल पठाडे आदी.