‘त्या’ कर्मचाऱ्यांना हलगर्जीपणाबद्दल नोटीस द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:18 PM2018-07-31T23:18:59+5:302018-08-01T00:18:33+5:30

जुन्या नाशिकमधील कथडा येथील झाकीर हुसेन रुग्णालयात प्रसूतीदरम्यान झालेल्या हलगर्जीपणाबद्दल रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना चुकीची वागणूक देणा-यांना नोटीस बजावावी तसेच रुग्णांशी सभ्य वर्तवणूक करण्याची तंबी द्यावी, अशी मागणी वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीने केली आहे.

 Give those 'employees' notice of neglect | ‘त्या’ कर्मचाऱ्यांना हलगर्जीपणाबद्दल नोटीस द्या

‘त्या’ कर्मचाऱ्यांना हलगर्जीपणाबद्दल नोटीस द्या

Next

नाशिक : जुन्या नाशिकमधील कथडा येथील झाकीर हुसेन रुग्णालयात प्रसूतीदरम्यान झालेल्या हलगर्जीपणाबद्दल रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना चुकीची वागणूक देणा-यांना नोटीस बजावावी तसेच रुग्णांशी सभ्य वर्तवणूक करण्याची तंबी द्यावी, अशी मागणी वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीने केली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र देऊन समितीने या रुग्णालयात केलेल्या तपासणीत आढळलेल्या बाबींचा तपशील दिला आहे.  वडाळा येथील एका महिलेची झाकीर हुसेन रुग्णालयात प्रसूती झाली. परंतु फरशीवर तिची प्रसूती करण्यात आली. शिवाय संबंधित बालकास खासगी रुग्णालयात नेल्यानंतर ते दगावल्याने संबंधित महिलेने व त्यांच्या कुटुंबीयांनी या रुग्णालयातील कर्मचाºयांच्या विरोधात तक्रार केली होती. यासंदर्भात समितीचे सदस्य तसेच पूर्व प्रभाग समिती सभापती आणि अन्य सहकाºयांनी रुग्णालयास भेट देऊन माहिती घेतली. तक्रारदार महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने शहानिशा करण्यात आली. त्या महिलेची फरशीवर प्रसूती करण्याच्या प्रसंगातील अपरिहार्यता लक्षात घेऊन त्यासंदर्भात संबंधित कर्मचाºयास क्लिन चीट दिली आहे. मात्र रुग्णालयाचील कर्मचारी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांशी व्यवस्थित वागत नाही, अरेरावीने बोलतात तसेच सौजन्यपूर्वक वागत नसल्याने महापालिकेच्या रुग्णालयांविषयी जनमाणसात गैरसमज पसरत असल्याने त्यांना चांगल्या वर्तवणुकीसाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर संबंधिताना नोटिसा बजावाव्या, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.  दरम्यान, रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून संबंधितांनी काम करावे, यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे शिबिर घेऊन कर्मचाºयांंना प्रशिक्षित व सुसंस्कृत करावे, अशी सूचना चौकशी समितीच्या सदस्य पल्लवी पाटील, नयना गांगुर्डे, शोभा साबळे, समिना मेमन, रूची कुंभारकर, संतोष गायकवाड यांनी केली आहे.
क्लिन चीट : रुग्णांच्या नातेवाइकांना अरेरावी
त्या महिलेची फरशीवर प्रसूती करण्याच्या प्रसंगातील अपरिहार्यता लक्षात घेऊन त्यासंदर्भात संबंधित कर्मचाºयास क्लिन चीट दिली आहे. मात्र रुग्णालयाचील कर्मचारी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांशी व्यवस्थित वागत नसल्याच्या तक्रारी यावेळी समोर आल्या. रुग्णालयात येणाºया रुग्णांप्रमाणेच इतरांनादेखील अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची तक्रार केली जात आहे.

Web Title:  Give those 'employees' notice of neglect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.