मागणी करेल त्या गावाला टॅँकरने पाणी द्या सिन्नर तालुका कॉँग्रेस : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:45 AM2018-05-19T00:45:23+5:302018-05-19T00:45:23+5:30
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागात अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. अनेक गावांकडून टँकर मागणीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत,
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागात अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. अनेक गावांकडून टँकर मागणीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, मात्र अनेक प्रस्ताव लालफितीत अडकल्यामुळे ग्रामस्थांचा जीव कासाविस होत आहे. पाणीटंचाईची दाहकता लक्षात घेऊन मागेल त्या गावाला तत्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरद शिंदे, तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले.
पूर्व भागातील बºयाचशा गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी स्रोत नाही. जवळपासचे बंधारे आटल्याने विहिरीही कोरड्याठाक पडल्या आहेत. काही गावांमध्ये पाणीयोजना आहेत मात्र धरणांतील जलसाठे आटल्याने त्या अखेरच्या घटका मोजत आहेत.
काही पाणीयोजनांच्या समिती पदाधिकाºयांतील वादामुळे ग्रामस्थांना तहानलेले रहावे लागत आहे. वाड्या-वस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याची दाहकता तर अतिशय भयंकर असून, महिलांना पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ भटकंती करावी लागत आहे. जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागातील अधिकाºयांना निर्देश देऊन मागेल त्या गावाला तत्काळ टँकर सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. टँकर सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरद शिंदे, तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, गोपाळ गायकर, कैलास दातीर, राजकिरण नाईक, पुंजाराम हारक, दामू पाटील शेळके, अण्णासाहेब हारक, शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, चैतन्य देशमुख, बाळासाहेब शिंदे, गणेश जाधव, कमलाकर शेलार, उदय जाधव, सुनील जगताप, लक्ष्मण तुपे, अर्जुन घोरपडे, कैलास हिरे आदींच्या स्वाक्षºया आहेत.