तुला काय पाहिजे ते देतो, पण टॉवरवरून खाली उतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 01:30 AM2022-06-04T01:30:31+5:302022-06-04T01:30:56+5:30
पाथर्डी फाटा येथील मुरलीधरनगर परिसरात भाजी बाजारालगत असलेल्या महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या टॉवरवर शोले स्टाइल चढून जिवाचे बरे-वाईट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मद्य प्राशन केलेल्या नेताराम वाघाडे यास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अर्धा तासाचे जिकिरीचे प्रयत्न करून खाली उतरून प्राण वाचविले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
इंदिरानगर : पाथर्डी फाटा येथील मुरलीधरनगर परिसरात भाजी बाजारालगत असलेल्या महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या टॉवरवर शोले स्टाइल चढून जिवाचे बरे-वाईट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मद्य प्राशन केलेल्या नेताराम वाघाडे यास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अर्धा तासाचे जिकिरीचे प्रयत्न करून खाली उतरून प्राण वाचविले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. शुक्रवारी (दि.३) रात्री दहा वाजता त्याला खाली उतवण्यात पाेलिसांना यश आले. शुक्रवार (दि.३) वेळ रात्री साडेनऊ वाजेची पाथर्डी फाटा येथील मुरलीधरनगर परिसरातील भाजी मार्केटलगत महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या टॉवरवर एक व्यक्ती जोरात वर चढत होता, ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली. तातडीने इंदिरानगर पोलीस स्टेशनला कळवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी सुधाकर आव्हाड, सुरेश पवार, मनीष चौधरी, महेश मोरे, अशोक कराड, संदीप लांडे, भाऊराव गवळी पोहोचले, त्यावेळी बघ्यांची गर्दी असल्यामुळे त्यांना संबंधित इसमाला समजण्यासाठी आणि समजावण्यासाठी अडचण निर्माण होत होती. त्यामुळे दोन पोलीस कर्मचारीही टॉवरवर चढले, तर अन्य पेालीस कर्मचारी खाली उभे राहूनच त्याला विनवणी करीत होते. त्यास तुला काय पाहिजे ते आम्ही देऊ, तुला कोणी काही करणार नाही, तू खाली उतर, असे समजवाले; पण तो ऐकण्यास तयार नव्हता. अनेक प्रकारे मिनतवारी करून पोलिसांनी मोठ्या मुश्किलीने त्याची समजूत काढली आणि त्यानंतर ताे खाली उतरला. त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव नेताराम वाघाडे असे सांगितले. त्याने मद्य प्राशन केले होते. त्याचे पैसे कोणीतरी काढून घेतले म्हणून तो महावितरणच्या टॉवरवर चढला होता, असे त्याने सांगितले.
--