माळी समाजसेवा समितीच्या वतीने सेवाभावी कार्यकर्त्यांना पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:23 AM2017-11-29T00:23:38+5:302017-11-29T00:24:39+5:30

माळी समाजसेवा समितीच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा उत्साहात पार पडला. फुले यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजच्या काळातही शेतीसाठी तंतोतंत लागू होत आहेत. त्यामुळे सरकारने शेतीविषयी धोरण आखताना महात्मा फुले यांच्या शेतीविषयक आर्थिक सिद्धांताचा विचार करण्याची गरज असल्याचे मत विश्वास सहकारी बँकेचे चेअरमन विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केले.

 Giving the award to the charitable workers on behalf of the Mali Social Service Committee | माळी समाजसेवा समितीच्या वतीने सेवाभावी कार्यकर्त्यांना पुरस्कार प्रदान

माळी समाजसेवा समितीच्या वतीने सेवाभावी कार्यकर्त्यांना पुरस्कार प्रदान

Next

नाशिक : माळी समाजसेवा समितीच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा उत्साहात पार पडला. फुले यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजच्या काळातही शेतीसाठी तंतोतंत लागू होत आहेत. त्यामुळे सरकारने शेतीविषयी धोरण आखताना महात्मा फुले यांच्या शेतीविषयक आर्थिक सिद्धांताचा विचार करण्याची गरज असल्याचे मत विश्वास सहकारी बँकेचे चेअरमन विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केले.  परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रात ठाकूर यांचे ‘महात्मा जोतिबा फुले व आजची आर्थिक परिस्थिती’ विषयावर व्याख्यान संपन्न झाले.  अध्यक्षस्थानी डॉ. दौलत गांगुर्डे यांच्यासह मधुकर जेजूरकर, सातपूर सभापती माधुरी बोलवरकर, नगरसेवक राहुल दिवे, संतोष गायकवाड, नाट्य कलाकार योगेश थोरात, महेंद्र जाधव, दत्तात्रय माळी, कैलास सैनी, सुभाष पवार, विलास जगताप, राका माळी, डॉ. अरुण निकम, चंद्रकांत बागुल, सुरेश खोडे, अनंता सूर्यवंशी आदी उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जागृती कोलगीकर यांनी, तर हरिश्चंद्र विधाते यांनी आभार मानले. 
विशेष पुरस्काराने गौरव 
नगरसेवक राहुल दिवे व मनीष जाधव यांना उद्योगरत्न, चंद्रकांत बागुल यांना समाजरत्न व डॉ. अरुण निकम यांना धन्वंतरी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हरिभाऊ लासुरे, रामप्रसाद कातकाडे, भाऊसाहेब पवार, हनिफभाई बशीर, सुरेख पारख, बापू निस्ताने आदींना सामाजिक कार्य गौरव ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव वाघ, यादवराव बनकर, प्रकाश मौले, भास्कर थोरात, नाट्य व सिनेक्षेत्रातील योगेश थोरात, वैभव वाघमारे, सचिन शिंदे, शिक्षण क्षेत्रातील उषा मोरे, इंदिराताई अहिरे, खेळाडू सुनील पवार, अध्यात्मिक क्षेत्रात कैलास वेलजाळी, उत्तम शिंदे व सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने बाळासाहेब भास्कर, अरुण थोरात, मयूर मोटकरी आदींना सन्मानित करण्यात आले.

Web Title:  Giving the award to the charitable workers on behalf of the Mali Social Service Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक