बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविल्याने आनंदोत्सव
By admin | Published: January 10, 2016 10:53 PM2016-01-10T22:53:39+5:302016-01-10T22:56:31+5:30
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविल्याने आनंदोत्सव
वरखेडा : ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय असलेल्या बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविल्याने दिंडोरी तालुक्यातील जऊळके-वणी येथील तांगा शौकिनांनी गुलालाची उधळण करीत, फटाक्यांची आतषबाजी व एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.
शर्यतीत बैलाचा छळ केला जात असल्याच्या तक्रारीवरून, केंद्र सरकारने तांगा शर्यतीवर बंदी घातली होती. सदर बंदी उठविण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी व तांगा शौकिनांनी अनेक ठिकाणी आंदोलने केली होती.
या बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. ग्रामीण भागातील लोकप्रिय व पांरपरिक खेळावरील बंदी उठविण्यात आल्याने सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे. तालुक्यातील जऊळके-वणी येथे साजरा करण्यात आलेल्या आनंदोत्सवप्रसंगी सुनील पाटील, शंकर दवंगे, सुदाम दवंगे,
अशोकराव दवंगे, रमेश पाटील, गणपत पाटील, अशोक बकरे, कैलास दवंगे, योगेश दवंगे, गणेश दवंगे, अविनाश दवंगे, पंडू दवंगे आदिंसह ग्रामस्थ, तांगा शौकिन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(वार्ताहर)