कला महाविद्यालयात गुणगौरव समारंभ

By admin | Published: February 12, 2017 10:36 PM2017-02-12T22:36:11+5:302017-02-12T22:36:28+5:30

बारागावपिंप्री : जलकुंभ, कॅण्टीनचे उद्घाटन

Giving ceremony in Art College | कला महाविद्यालयात गुणगौरव समारंभ

कला महाविद्यालयात गुणगौरव समारंभ

Next

 सिन्नर : तालुक्यातील बारागावपिंप्री येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव, जलकुंभ व कॅण्टीनचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला.
व्यासपीठावर साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणपत मुठाळ, सचिव प्रवीण जोशी, उद्योजक विजय केला, रवींद्र मालुंजकर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ए. डी. बागुल, सरपंच विजय उगले, कलावती केला आदी मान्यवर उपस्थित होते. उद्योजक विजय केला यांनी दिलेल्या निधीतून बांधण्यात आलेल्या जलकुंभाचे उद्घाटन कलावती नंदलाल केला यांच्या हस्ते, तर संस्थेचे अध्यक्ष मुठाळ यांच्या हस्ते कॉलेजच्या कॅण्टीनचे उद्घाटन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सांस्कृतिक विभागाच्या उपक्रमांत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
एका गोठ्यातून सुरू झालेल्या शाळेचे मोठ्या ज्ञानवृक्षात रुपांतर झाल्याचे सचिव जोशी यांनी यावेळी सांगितले. यावेळी मालुंजकर यांनी विविध कविता सादर केल्या.
प्राचार्य डॉ. डी. एल. फरताळे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती दिली. सांस्कृतिक विभाग प्रमुख वृषाली उगले यांनी अहवाल वाचन केले. मंजुश्री उगले यांनी क्रीडा विभागाचे अहवाल वाचन केले. डॉ. राणी सरोदे यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना सावंत यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Giving ceremony in Art College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.