योग्य उपचारांनी हृदयविकाराच्या रुग्णांना जीवनदान: चोपडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:31 AM2019-07-21T01:31:32+5:302019-07-21T01:31:51+5:30
हृदयविकाराचा झटका आला तर रुग्णाच्या जवळचे सर्वच घाबरून जातात. परंतु, अशा परिस्थितीत घाबरून न जाता योग्य उपचार करून रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने उपचार केले तर अत्यवस्थ रुग्णांनाही जीवनदान मिळणे शक्य असल्याचे प्रतिपादन हृदयविकार तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी केले.
नाशिक : हृदयविकाराचा झटका आला तर रुग्णाच्या जवळचे सर्वच घाबरून जातात. परंतु, अशा परिस्थितीत घाबरून न जाता योग्य उपचार करून रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने उपचार केले तर अत्यवस्थ रुग्णांनाही जीवनदान मिळणे शक्य असल्याचे प्रतिपादन हृदयविकार तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी केले.
शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात रामनाथ चांडक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्कृती वैभवतर्फे ‘हृदयविकार : काळजी, उपाय व उपचार’ व्याख्यानमालेचे शनिवारी (दि.२०) उद्घाटन झाले. व्यासपीठावर राधाकिसन चांडक, दीपक चांडक, डॉ. चेतन पाटील, डॉ. श्रीकांत उपासणी उपस्थित होते. यावेळी ‘रोबोटिक एन्जिओप्लास्टी’ विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी हृदयाच्या अतिशय किचकट शस्त्रक्रियाही रोबोटीक तंत्रज्ञानाने करणे शक्य असल्याचे सांगितले. तर भारती भूलतज्ज्ञ संघटनेच्या नाशिक शाखाध्यक्षा डॉ. सुनीता संकलेचा यांनी ‘सीपीआर’ विषयावर मार्गदर्शन करताना हृदयविकाराच्या प्रसंगी प्रथमोपचाराने रुग्णांना जीवन संजीवनी देणे शक्य असल्याचे सांगितले. प्रास्ताविक नंदन दीक्षित यांनी केले. पल्लवी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कैवल्य जोशी यांनी आभार मानले.