धन्वंतरी जयंतीनिमित्त ग्रंथदिंडी
By admin | Published: October 28, 2016 11:31 PM2016-10-28T23:31:13+5:302016-10-28T23:31:46+5:30
आयुर्वेदाचा जागर : वृक्षरथासोबत योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
नाशिक : पंतप्रधान कार्यालय व आयुष विभाग यांच्या निर्देशानुसार धन्वंतरी जयंती अर्थात धनत्रयोदशीनिमित्त शुक्रवारी (दि.२८) निमाच्या (एनआयएमए) नाशिक शाखेतर्फे आयुर्वेद दिंडी काढण्यात आली.
भोसला मिलिटरी स्कूल गेट (मॉडेल कॉलनी) पासून आयुर्वेद दिंडीची सुरु वात झाली. यावेळी श्री साक्षी ढोलपथकासह ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी व योग प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्रारंभी ग्रंथदिंडी त्यापाठोपाठ सजवलेल्या रथात धन्वंतरी देवतेसह चरक ऋ षींच्या वेशभूषेत बसलेली मुले, त्या मागे श्री साक्षी ढोल पथक त्यामागे विविध आयुर्वेदिक वृक्षांची माहिती देणारा वृक्षरथ आणि त्यामागे योगाचे प्रात्यक्षिक सादर केले जात होते. सर्वांत शेवटी आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थी आणि डॉक्टर सहभागी झाले होते. दिंडीत महिलांनी हिरवी साडी व पुरु षांनी शुभ्र वस्त्र परिधान करून सहभाग घेतला. भोसला मिलिटरी स्कूल गेट (मॉडेल कॉलनी) येथून निघालेली आयुर्वेद दिंडी कॉलेज रोडमार्गे डोंगरे वसतिगृह येथे पोहोचली. तेथे धन्वंतरीपूजन व स्तवन करून कार्यक्र माची सांगता करण्यात आली. आयुर्वेद दिंडीत हरित विश्व परिवार, त्र्यंबकेश्वर सेवा शिबिर, ग्रीन रिव्होल्युशन, इंदिरानगर आयुर्वेद मंडळ, आयुर्वेद महाविद्यालये, आयुर्वेद सेवा संघ, आयुर्वेद महासंमेलन, आयुर्वेद व्यासपीठ, विविध आयुर्वेदीय औषधी वितरक व कंपन्या, विविध आयुर्वेद संघटना सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)