सातपूर भागात मद्यपीने फोडली नव्या कोऱ्या बसची काच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 01:43 AM2021-07-24T01:43:05+5:302021-07-24T01:44:06+5:30

सातपूरच्या मद्यपी टवाळखोराने मनपाच्या बसवर दगडफेक करून वाहनचालकासही मारहाण केल्याची घटना घडली असून या घटनेतून नाशिक महापालिकेने मोठ्या दिमाखात सुरू केलेल्या नव्या कोऱ्या सिटी लिंक बसवर टवाळखोरांची वक्रदृष्टी पडण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी मद्यपीविरोधात सातपूर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

The glass of a new empty bus was broken by an alcoholic in Satpur area | सातपूर भागात मद्यपीने फोडली नव्या कोऱ्या बसची काच

सातपूर भागात मद्यपीने फोडली नव्या कोऱ्या बसची काच

Next
ठळक मुद्देचालकालाही मारहाण : सिटी लिंक बसवर मद्यपींकडून दगडफेक

सातपूर : सातपूरच्या मद्यपी टवाळखोराने मनपाच्या बसवर दगडफेक करून वाहनचालकासही मारहाण केल्याची घटना घडली असून या घटनेतून नाशिक महापालिकेने मोठ्या दिमाखात सुरू केलेल्या नव्या कोऱ्या सिटी लिंक बसवर टवाळखोरांची वक्रदृष्टी पडण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी मद्यपीविरोधात सातपूर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बससेवा सुरू होऊन महिनाही पूर्ण होत तोच नव्या कोऱ्या बसला टवाळखोरांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागू लागले आहे. श्रमिकनगर बस थांब्यावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास सिटी लिंक बस क्रमांक एमएच १५ जीव्ही ७९३९ तपोवन ते श्रमिकनगर ही बस थांबली होती. बसचालकाने नेहमीप्रमाणे प्रवासी भरण्यासाठी दरवाजा उघडला असता परिसरातील एक टवाळखोर मद्यपान करून बसमध्ये चढला. बस लवकर चालव म्हणून वाहनचालकास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. चालकाने दुर्लक्ष केले म्हणून मद्यपीने आतूनच बसच्या काचेवर दगड फेकून काच फोडली. चालकाने खाली उतरून झालेले नुकसान पाहत असताना चालकालाही दगड मारून जखमी केले. या दगडफेकीत बस चालकाच्या डोक्याला आणि कानाला दुखापत झाली आहे. मद्यपीचा उपद्रव सुरूच असताना त्याचे मित्रही या ठिकाणी आले. त्यांनीही चालकाला मारहाण केली. या घटनेनंतर टवाळखोरांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात सरकारी मालमत्तेचे नुकसान व वाहनचालकास मारहाण केल्याप्रकरणी अज्ञात टवाळखोराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Web Title: The glass of a new empty bus was broken by an alcoholic in Satpur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.