शहरातून काचबिंदू जनजागृती फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:42 PM2019-03-13T23:42:44+5:302019-03-14T00:06:40+5:30

‘काचबिंदूने गमावलेली दृष्टी परत येत नाही’, ‘काचबिंदूवरील औषधे नियमित घ्या’, ‘डोळे दुखले जरा, काचबिंदूची चाचणी करा’ अशा प्रबोधनपर घोषवाक्यांचे फलक हाती घेत शहरातून काचबिंदू जनजागृती फेरी काढण्यात आली.

Glaucoma awareness movement from the city | शहरातून काचबिंदू जनजागृती फेरी

शहरातून काचबिंदू जनजागृती फेरी

Next

नाशिक : ‘काचबिंदूने गमावलेली दृष्टी परत येत नाही’, ‘काचबिंदूवरील औषधे नियमित घ्या’, ‘डोळे दुखले जरा, काचबिंदूची चाचणी करा’ अशा प्रबोधनपर घोषवाक्यांचे फलक हाती घेत शहरातून काचबिंदू जनजागृती फेरी काढण्यात आली.
राज्य नेत्रतज्ज्ञ संघटना व नाशिक नेत्रतज्ज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड, नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. नानासाहेब खरे व सचिव डॉ. कुणाल निकाळे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड आदींच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.
या रॅलीत इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब, राइझिंग सन फाउण्डेशन, मविप्र वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, आॅप्टोमेट्री महाविद्यालयाचे विद्यार्थी, जिल्हा रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभागाचे सर्व कर्मचारी, वैद्यकीय प्रतिनिधी आदी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काचबिंदू या नेत्रविकाराबाबातची जनजागृती समाजात व्हावी, जेणेकरून काचबिंदूच्या आजारावर नियंत्रण मिळविता येईल, या उद्देशाने ही फेरी काढण्यात आली होती.

Web Title: Glaucoma awareness movement from the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.