शिवरायांचे वैभवशाली सागरी दुर्ग जलमार्गाने जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:12 AM2021-01-04T04:12:37+5:302021-01-04T04:12:37+5:30

संभाजीराजे हे रविवारी (दि.३) नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी दुपारी ‘लोकमत’च्या अंबड येथील मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ...

The glorious sea fort of Shivaraya will be connected by water | शिवरायांचे वैभवशाली सागरी दुर्ग जलमार्गाने जोडणार

शिवरायांचे वैभवशाली सागरी दुर्ग जलमार्गाने जोडणार

Next

संभाजीराजे हे रविवारी (दि.३) नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी दुपारी ‘लोकमत’च्या अंबड येथील मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी संभाजीराजे यांचे स्वागत केले. यावेळी प्रशासन विभागप्रमुख राहुल धांदे उपस्थित होते.

या भेटीत संभाजीराजे यांनी किरण अग्रवाल यांच्यासह संपादकीय सहकाऱ्यांसोबच चर्चा केली. याप्रसंगी बोलताना संभाजीराजे म्हणाले, महाराजांच्या स्वराज्याचे साक्षीदार अन‌् महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड-किल्ल्यांचा विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सातत्याने चर्चा केली असून त्यांनीही सकारात्मकता दर्शविली आहे. गेटवे ऑफ इंडियापासून खांदेरी, उंदेरी, कुलाबा, पदम‌्दुर्ग, मुरुड-जंजिरा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे गड-किल्ले सागरी जलमार्गाने जोडण्याबाबत ठाकरे यांच्याकडे प्रस्तावदेखील सादर केला आहे. या जलमार्गात अलिबाग, काशिद, अक्षीसारखे समुद्रकिनारेही (बीच) येतात. यामुळे सागरी दुर्ग पर्यटनालाही अधिक वाव मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

पदम‌्दुर्ग येथे जेट्टी तयार करण्यासाठी परवानगीही मिळाल्याची माहितीही संभाजीराजे यांनी यावेळी दिली. दक्षिण भारतातील ‘जिंजी’ दुर्गाच्या विकासालाही प्रारंभ करण्यात आला असून हा दुर्ग अत्यंत देखणा असा असून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. यावरुन त्यांच्या दूरदृष्टीची प्रचिती येते असे संभाजीराजे यावेळी म्हणाले. याप्रसंगी छावा क्रांतिवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम उपस्थित होते.

--इन्फो---

शिवस्मारक पूर्वीच्याच जागी व्हावे

शिवस्मारक पूर्वीच्या जागेतून तीन किलाेमीटर अंतरावर तयार करण्याचे नियाेजन सरकारने केले आहे. त्यामुळे ३ हजार काेटी रुपयांचा खर्च वाढला असून हे स्मारक पूर्वीच्याच १ किलाेमीटरच्या अंतरावर उभाण्यात यावे. यासाठी खर्चही कमी लागेल असे संभाजीराजे म्हणाले.

--इन्फो--

फेब्रुवारीत किल्ल्यांचा पाहणी दौरा

फेब्रुवारी महिन्यात संभाजीराजे यांचा वाढदिवस येतो. या औचित्यावर राज्यातील सुमारे शंभर किल्ल्यांना प्रत्यक्ष भेट देण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. गड-किल्ले पाहणी दौऱ्याचा शुभारंभ नाशिकमधूनच करणार असल्याचा मानसही संभाजीराजे यांनी बोलताना व्यक्त केला.

--इन्फो--

‘फोर्ट फेडरेशन’ची रोवणार मुहूर्तमेढ

राज्यातील दुर्लक्षित गड-किल्ल्यांचा विकास साधण्यासाठी राज्यस्तरीय ‘फोर्ट फेडरेशन’ची स्थापना करत राज्य पुरातत्व विभागासोबत सामंजस्य करार करुन या फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची पडझड रोखण्याचा निर्धारही संभाजीराजे यांनी बोलून दाखविला.

---

फोटो क्र : ०३पीएचजेएन८२/८३

Web Title: The glorious sea fort of Shivaraya will be connected by water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.