गौरींच्या सजावटीतुन कोरोना योध्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 07:11 PM2020-08-25T19:11:42+5:302020-08-25T19:12:25+5:30

त्र्यंबकेश्वर : श्रीगणराया पाठोपाठ घरा घरात मंगळवारी (दि.२५) जेष्ठा, कनिष्ठा गौरींचे आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

The glory of the Corona Warriors through the decoration of Gauri | गौरींच्या सजावटीतुन कोरोना योध्यांचा गौरव

गौरींच्या सजावटीतुन कोरोना योध्यांचा गौरव

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना योध्यांना सलाम

लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : श्रीगणराया पाठोपाठ घरा घरात मंगळवारी (दि.२५) जेष्ठा, कनिष्ठा गौरींचे आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोनपावलांनी आलेल्या गौरींच्या स्वागतासाठी घरोघर कामांची लगबग सुरु होती. कोरोनामुळे पुरु ष मंडळी घरीच असल्याने महिलावर्गाला त्यांची चांगलीच मदत झाली. गेल्या वीस दिवसानंतर आज प्रथमच पावसाने अधुन मधुन थोडी फार विश्रांती घेऊन स्वच्छ सुर्यप्रकाश पडल्याने वातावरण आल्हाददायक बनले होते.
प्रत्येक ठिकाणी गौरींसाठी उत्कृष्ठ सजावट करण्यात आलेली आहे. तर माहेरी आलेल्या गौरींच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थ तयार करण्यासाठी महिलावर्गाची लगबग सुरु होती. घराघरात खमंग वास दरवळत आहे. घरांसमोर विविधरंगी रांगोळ्या व गौरींचे सोनपावलं लक्ष वेधुन घेत आहे. गौरी गणपतीच्या आगमनाने गेले पाच महिन्यांपासुन घरातच असलेल्या बच्चे कंपनीमध्ये उत्साह संचारला होता. आज गौरींचं आगमन झाल्यावर उद्या पुजन तर तिसऱ्या दिवशी मुळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन होईल.

कोरोना योध्यांना सलाम
त्र्यंबकेश्वर येथील वैभव व विनोद ऊमाकांत देशपांडे यांच्या घरातील जेष्ठा कनिष्ठा गौरींसाठी केलेली सजावटीतुन कोरोना बाबद घ्यावयाची काळजी व कोरोना योद्यांचा गौरव करण्यात आला. धार्मिकता जपत असताना सामाजिक भान देखिल लक्षात घेत्तून ते प्रत्यक्ष साकारल्याबद्दल त्याचीच चर्चा गावात कली जात होती. (फोटो २५ त्र्यंबक)

Web Title: The glory of the Corona Warriors through the decoration of Gauri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.