निरक्षर आईच्या स्मरणार्थ गुणवंत शिक्षकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 04:01 PM2020-03-03T16:01:16+5:302020-03-03T16:01:34+5:30
शिक्षकाचाच उपक्रम : रोख बक्षिसांचे वितरण
जळगाव नेऊर : निरक्षर असूनही संस्कारी व कर्तृत्ववान असलेल्या आपल्या आईच्या स्मरणार्थ एरंडगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशिल शिक्षक राजेंद्र ठोंबरे यांनी देशमाने व जळगाव नेऊर केंद्रातील प्रत्येकी तीन उत्कृष्ट शिक्षकांचा रोख बक्षिस देऊन गौरव केला.
एरंडगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्र मशिल शिक्षक राजेंद्र ठोंबरे यांनी आईच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ केंद्रातील पहिलीच्या वर्गासाठी शिकविणाऱ्या प्रत्येकी तीन शिक्षकांना रोख बक्षीस देऊन गौरव केला. आपली आई निरक्षर होती परंतु, तिने उच्च शिक्षितालाही लाजवेल अशी समज तिच्यात होती. तिच्या गुणांची सदैव आठवण राहावी म्हणून म्हणून हा उपक्रम राबविल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. यावेळी जळगाव केंद्रातील कल्पना बोचरे (पिंपळगाव लेप), सुरेश वाघ (नेऊरगाव), मीनल बोडके (एरंडगाव बु), तर देशमाने केंद्रातीलअनिल महाजन (देशमाने), संदीप साळवे (मुखेड),गेनसिद्ध शिवगोंडे (खडकीमाळ) या शाळेतील शिक्षकांना केंद्रप्रमुख निंबा केदारे, पुंडलिक अनारसे, दादासाहेब बोराडे, सुनील गीते व इतर मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले. हा उपक्र म सेवेत असे पर्यंत सुरू ठेवण्याचा मानस ठोबरे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सुरेश वाघ, नानासाहेब कुºहाडे, अंबादास मोरे, दादासाहेब बोराडे, जिजा जावळे, सुनील गीते, जालंदर गावडे, जालिंदर सोनवणे, सुंदरराव हारदे, अश्विनी जगदाळे, दिग्विजय निकम, कल्पना पारेकर व दोन्ही केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.