नाशिकचे वैभव ! समर्थस्थापित गोमय मारुती मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:08+5:302021-07-12T04:11:08+5:30

सध्याच्या जालना जिल्ह्यातील जांब गावातून निघालेले नारायण ठोसर अर्थात समर्थ रामदास स्वामी नंदिनी आणि गोदावरीच्या संगमस्थानापासून जवळच असलेल्या टाकळी ...

The glory of Nashik! Supported Gomay Maruti Temple | नाशिकचे वैभव ! समर्थस्थापित गोमय मारुती मंदिर

नाशिकचे वैभव ! समर्थस्थापित गोमय मारुती मंदिर

googlenewsNext

सध्याच्या जालना जिल्ह्यातील जांब गावातून निघालेले नारायण ठोसर अर्थात समर्थ रामदास स्वामी नंदिनी आणि गोदावरीच्या संगमस्थानापासून जवळच असलेल्या टाकळी गावातील गुहेत येऊन राहिले. साधारणपणे इ. स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे टाकळी गावातील या गुहेत राहून त्यांनी जप, तप आणि कठोर साधना केली. नंदिनी व गोदावरीच्या संगमात उभे राहून ‘श्रीराम जयराम जयजय राम’ या मंत्राचा तेरा कोटी जप केला.

समर्थ रामदास स्वामींचे पहिले शिष्य उद्धवस्वामी हे इथेच होते. नाशिकमधून देशाटनाला जाण्यापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी शिष्याच्या आराधनेसाठी त्या गुहेबाहेरील जागेत गोमय हनुमानाची मुर्ती स्थापन केली. १९७० पर्यंत मंदिर अगदी सामान्य अवस्थेत होते. मात्र, त्यानंतरच्या काळात समर्थ रामदास स्वामी मठ ट्रस्टच्या पुढाकाराने मंदिर सुस्थितीत आणले गेले. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले असून, आता अत्यंत भव्य स्वरूपातील मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे.

फोटो

११गोमय मारुती

Web Title: The glory of Nashik! Supported Gomay Maruti Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.