निसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 02:33 PM2018-01-30T14:33:05+5:302018-01-30T14:35:18+5:30

या अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे कारण आम्ही प्राणी संग्रहालयात नव्हे तर अभयारण्यात सफारी करत होतो.

 The glory of nature Tadoba; Wild animals need to be born and relation with nature | निसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद

निसर्गाचे वैभव ताडोबा; वन्यजीवांचा लागतो लळा अन् निसर्गाशी जुळते ऋुणानुबंद

googlenewsNext

नाशिक : प्रशांत खरोटे, आॅनलाइन लोकमत - वन्यजीव छायाचित्रणासाठी ताडोबा माझा नेहमीच पसंतीचा राहिला आहे. ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. अंधारी व्याघ्र प्रकल्प नावाने ताडोबा ओळखले जाते. ताडोबाने कधी आजपर्यंत निराश केले नाही. यावेळेस ताडोबा सफारीचा भन्नाट अनुभव माझ्या शिदोरीमध्ये जमा झाला.

एक नव्हे दो नव्हे तर तब्बल पाच दिवसांत सहा सफारी मी माझ्या छायाचित्रकार मित्रांच्या साथीने ताडोबाच्या पुर्ण केल्या. ताडोबा अभयारण्य पट्टेरी वाघांच्या वास्तव्यासाठी जगप्रसिध्द आहे. ‘अभयारण्य’ या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. भय नसलेले आरण्य अशा या अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे कारण आम्ही प्राणी संग्रहालयात नव्हे तर अभयारण्यात सफारी करत होतो.

ताडोबा हे वाघ, सांबर, मगर, वानर, हरिण यांसारख्या विविध वन्यजीव प्राण्यांच्या वास्तव्यासाठी ओळखले जाते. याबरोबरच पक्ष्यांचेही विविध प्रकार ताडोबामधील जैवविविधता सांगून जाते. ताडोबाची सफारी माझ्यासाठी नेहमीच रोमांचकारी ठरली आहे. ‘तारा’ बाळांतीण झाली असे समजले आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. ही शुभवार्ता कानावर येताच माझी पावले ताडोबाच्या दिशेने वळाली. बाळांतीण झालेली वाघाची मादी व तिचे छावे ताडोबाच्या अभयारण्यात मला बघायला मिळाले.

जणू ही ‘तारा’ आपल्या छाव्यांना अभयारण्याची ओळखच करुन देत असावी, अशी मनसोक्त बागडत होती. कारण या अभयारण्याच्या ओळखीनंतर त्यांना तेथे आपल्या भक्ष्याच्या शिकारीचे प्रशिक्षण घ्यायचे होेते. त्यामुळे त्या प्रदेशाची ओळख असणे तितकेच गरजेचे होते. त्यामुळे ही वाघीण आपल्या बछड्यांना अभयारण्याच्या वाटांवर फिरवत होती. त्यामुळे ही वेळ आमच्यासाठी एक पर्वणीपेक्षा कमी नव्हती. कारण वाघीण आपल्या बछड्यांसमवेत ताडोबामधील पायवाटेने फिरताना आढळणे हा एक वन्यजीव छायाचित्रकारांसाठी अमुल्य व दुर्मीळ क्षण असतो. मी अनुभवलेले ताडोबा आणि त्याचे सौंदर्य टिपलेल्या काही छायाचित्रांच्या माध्यमातून लोकमत आॅनलाईनच्या वाचकांपुढे ठेवत आहे.

 

Web Title:  The glory of nature Tadoba; Wild animals need to be born and relation with nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.