ठाणगाव येथे कोरोना योद्ध्याचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 12:23 AM2022-01-19T00:23:13+5:302022-01-19T00:24:32+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या ठाणगाव आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला.
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील स्व.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या ठाणगाव आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला.
माजी सरपंच नामदेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास प्राचार्य आर.व्ही. परहर, अमित पानसरे, डी.एम. आव्हाड, शेखर कर्डीले, ए.टी. शिंदे, भाऊसाहेब काकड, राजेंद्र काकड, भगवान काकड, संतोष काकड आदी उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, गोपीनाथ मुंडे, भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून, कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
ठाणगाव आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आर.डी. धादवड, डॉ.भाग्यश्री परदेशी, डॉ.नीलेश केदारे, एस.जी. काळे, एन.आर. घोटेकर, आर.बी. जाधव, डी.एस. ठाकरे, आर.एस. लोणारे, सुनीता भागवत, शारदा शेलार, शोभा डगळे, रंजना गाडेकर, सोनाली व्यवहारे, राहुल गोसावी, संतोष शिंदे आदींचा कोरोना योद्धा म्हणून तर रयतसेवक वाय.एम. रूपवते, ए.के. चव्हाण, आर.एम. मणियार, एस.बी. ठुबे यांनी ही कोरोना काळात घरोघरी जाऊन सर्व्हे केला, म्हणून त्याचाही गौरव करण्यात आला.
मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र काकड, उमेश काकड, बाळासाहेब काकड, भाऊसाहेब काकड, नवनाथ दौंड, विलास आव्हाड, अशोक लांडगे, महेश काकड, संतोष काकड आण्णासाहेब काकड, कैलास काकड, संजय कांगणे, हरिभाऊ काकड, दत्तू काकड आदी उपस्थित होते.