सेवाकुंज येथे महिलांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:17 AM2021-03-09T04:17:29+5:302021-03-09T04:17:29+5:30
सेवाकुंज येथील संस्थेच्या केंद्रात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारी शक्ती सन्मान२०२१ चे आयोजन केले होते. यावेळी विविध क्षेत्रात ...
सेवाकुंज येथील संस्थेच्या केंद्रात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारी शक्ती सन्मान२०२१ चे आयोजन केले होते. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी वासंती दीदी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. त्या म्हणाल्या, नारी तू नारायणी असे महिलांच्या गौरवासाठी आपल्या सुभाषितांमध्ये म्हटले आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव्यांच्या कुवारी कन्या पूजनाचे संस्कार भारतातील नद्यांची नावे महिलावरून आहे. ब्रह्माकुमारी विद्यालयातसुद्धा महिलांनाच पुढे करून विश्व परिवर्तनाचे कार्य प्रजापिता ब्रह्मा बाबा यांनी सुरू केले, असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी शिक्षण समिती सभापती संगीता गायकवाड, प्राचार्य संगीता बाफना, मीनाक्षी जगदाळे, वर्षा पाटील, लीला पाठक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुमार ओमकार, दिलीप बोरसे यांनी स्वागत गीताने केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुष्पा दीदी यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील तब्बल ५१ महिलांचा शाल श्रीफळ सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
===Photopath===
080321\08nsk_39_08032021_13.jpg
===Caption===
ब्रम्हकुमारी केंद्राच्यावतीने महिलांचा सत्कार