कोजागरीसाठी जायगावहून पायी दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 03:08 PM2019-10-11T15:08:29+5:302019-10-11T15:09:03+5:30
नायगाव - श्री क्षेत्र वणी येथिल सप्तश्रृंगगडावरील कोजागरी पोर्णिमेच्या उत्सवासाठी सिन्नर तालुक्यातील जायगाव येथुन पायी दिंडी सोहळ्याचे शुक्र वारी सकाळी प्रस्थान झाले. कै.हरिभाऊ दिघोळे यांनी सुरू केलेल्या या पायी दिंडी सोहळ्याचे हे २५ वे वर्ष आहे.
नायगाव - श्री क्षेत्र वणी येथिल सप्तश्रृंगगडावरील कोजागरी पोर्णिमेच्या उत्सवासाठी सिन्नर तालुक्यातील जायगाव येथुन पायी दिंडी सोहळ्याचे शुक्र वारी सकाळी प्रस्थान झाले. कै.हरिभाऊ दिघोळे यांनी सुरू केलेल्या या पायी दिंडी सोहळ्याचे हे २५ वे वर्ष आहे. शुक्र वारी सकाळी सहा वाजता लोकनेते तुकारामजी दिघोळे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तथा सुर्योदय पतसंस्थेचे संचालक चंद्रकांत बोडाके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पायी दिंडी सोहळ्यास सुरूवात झाली. सप्तश्रुंगी माता की जय, जय माता दीच्या जयघोषात भाविकांनी गडाकडे प्रस्थान ठेवले. बोडके यांनी दिंडीतील भाविकांसाठी टी-शर्ट तर पायी दिंडी सोहळा समितीने पदयात्रेत सहभागी भाविकांच्या सामानासाठी टेम्पोची व्यवस्था केली आहे. सिन्नर-सायखेडा रस्त्याने माळेगाव,मापरवाडी,नायगाव आदी गावातून अनेक पायी दिंड्यांचे गडाच्या दिशेने प्रस्थान झाले.भाविकांच्या गर्दीमुळे रस्ता फुलून गेला होता.देवीच्या नावाच्या जयजयकाराने वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. या पायी दिंडी सोहळ्यात भिमा गिते,ग्रामपंचायत सदस्य भानुदास काकड,महेंद्र सांगळे,पुंडलिक बर्के,भाऊसाहेब केदार,सचिन दिघोळे,प्रविण दिघोळे,सोमनाथ चेवले,तानाजी दिघोळे,जयराम गामणे,विजय काकड,जगन दिघोळे,चंद्रकांत गायकवाड आदीसह भाविक सहभागी झाले आहे.