जुन्या पेन्शनसाठी आमदारांकडे साकडे घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:40 AM2020-12-17T04:40:53+5:302020-12-17T04:40:53+5:30
----------------- ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांवर प्रतिकूल परिणाम सिन्नर : गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने व सकाळी ...
-----------------
ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांवर प्रतिकूल परिणाम
सिन्नर : गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने व सकाळी मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम रब्बी पिकांवर होत आहे. गहू, हरबरा, कांदा याच्यासह रब्बीच्या पिकांची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र खराब हवामानामुळे या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
----------------
वीजवाहिनी पडून दोन गायींचा मृत्यू
सिन्नर : तालुक्यातील पाटपिंप्री येथे ११ केव्हीए क्षमतेची वीजवाहिनी पडून दोन गायींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे मनोहर उगले या शेतकऱ्याचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. गायींच्या अंगावर अचानक जीवंत वीजवाहिनी पडल्याने गायींचा मृत्यू झाला. महावितरणचे शाखा अभियंता गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तलाठी व कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनेची नोंद केली आहे.
----------------
वातावरणातील बदलामुळे रुग्णसंख्येत झाली वाढ
सिन्नर : हवामानात वारंवार होणाऱ्या बदलामुळे थंडी, ताप, सर्दी, खोकला या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या चार दिवसांपासून काही भागात पावसाच्या सरीसह सकाळी धुके पडत आहेत. थंडीचे प्रमाणही कमी-अधिक होत आहे. या वातावरणातील बदलामुळे लहान मुलांसह ज्येष्ठांना त्रास होत आहे. त्यामुळे थंडी, ताप, खोकला, सर्दी या रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.
----------------
सिन्नर औद्यागिक वसाहतीत वाढत्या चोऱ्या
सिन्नर : एमआयडीसी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक खंडेराव चौधरी यांनी सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयास (स्टाईस) भेट दिली. औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या चोऱ्या व उद्योजकांच्या अन्य समास्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी संस्थेच्या वतीने अध्यक्ष पंडितराव लोंढे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यवस्थापक कमलाकर पोटे यांच्यासह रामदास दराडे, सुनील कुंदे, बाबासाहेब दळवी, शिवाजी आवारे, दिलीप मुटकुळे उपस्थित होते.