विदयार्थ्यांच्या घरी जाऊन शाबासकीची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 10:11 PM2020-10-08T22:11:02+5:302020-10-09T01:13:14+5:30
नाशिक : कोरो ना संसर्गाचा पाश्र्वभूमीवर दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा सामुदायिक गुणगौरव करणे शक्य नसल्याने राष्ट्रातील एका शैक्षणिक संस्थेने ...
नाशिक : कोरो ना संसर्गाचा पाश्र्वभूमीवर दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा सामुदायिक गुणगौरव करणे शक्य नसल्याने राष्ट्रातील एका शैक्षणिक संस्थेने थेट गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा पाठीवर कौतुकाची थाप देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने गुणगौरव सोहळा साजरा केला आहे.
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने संस्थेच्या शहरी व ग्रामिण भागातील शाळेतील दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यां च्या घरी जाऊन त्यांना प्रमाणपत्र, रोख बक्षिस देऊन त्यांच्या पाठिवर शाबासकीची थाप दिल्याने विद्यार्थी व त्यांचे पालकही भाराऊन गेले
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडुन दहावी व बारावीच्या निकाल जाहिर झाल्यानंतर शैक्षणिक संस्था, शाळा,महाविदयालये तसेच सामाजिक संस्थाकडुन दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो. त्याचप्रमाणे नशिप्रकडूनही संस्थच्या शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये दहावी व बारावीत प्रथम आलेल्या गुणवंत विदयार्थ्याचा सत्कार करण्यात येतो. परंतु या वर्षी कोरोनाचे संकट असल्याने विदयार्थी गुणगौरव समारंभ घेता आला नाही. मात्र या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला पाहिजे व त्यांच्या पाठिवर शाबासकीची थाप दिली पाहिजे या विचाराने संस्थेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल व सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांनी संस्थेतील शहरी व ग्रामिण भागातील शाळेतील गुणवंत विदयार्थ्याच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंतीचे औचित्य साधुन संस्थेच्या शहरी व ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी
संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शाळांचे पदाधिकारी, शिक्षक यांनी त्यांच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जाऊन त्यांना प्रमाणपत्र, रोख बक्षिस व स्मृती चिन्ह देऊन सत्कार केला.
या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे सामूहिक गुणगौरव समारंभ घेता आला नाही, संस्थेच्या शहरी व ग्रामिण भागातील शाळाचे पदाधिकारी गुणवंत विद्यार्थ्यां च्या घरी गेले व त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. अशा परिस्थितीत ही गुणवंत विदयार्थी यांचा सत्कार झाल्याने पालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
- अश्विनीकुमार येवला, सचिव, नाशिप्र